कोल्हापुरात सोयाबीनवर  तांबेऱ्याचा प्रादुर्भाव  On soybeans in Kolhapur Outbreak of copper
कोल्हापुरात सोयाबीनवर  तांबेऱ्याचा प्रादुर्भाव  On soybeans in Kolhapur Outbreak of copper 
मुख्य बातम्या

कोल्हापुरात सोयाबीनवर  तांबेऱ्याचा प्रादुर्भाव 

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यातील सोयाबीनवर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव होत आहे. महापुरात नदीकाठच्या शेतीतील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना महापुरापासून बचावलेला सोयाबीन आता तांबेऱ्यामुळे अडचणीत आला आहे.  ऊस, भाजीपाला आणि सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. दोन महिन्यांपूर्वी आलेल्या महापुरात नदीकाठावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याचा सोयाबीनला फटका बसला. महापुरात झालेल्या पिकाच्या नुकसानीतून शेतकरी अद्याप बाहेर पडला नसताना पुन्हा सोयाबीनवरील तांबेऱ्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या अनेक भागांतील सोयाबीन पक्वतेच्या अवस्थेत आहे. काही भागांतील सोयाबीन पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. अपक्वतेच्या अवस्थेततील सोयाबीनला तांबेऱ्याचा काही प्रमाणात फटका बसणार आहे. उत्पादन घटून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.  जून दरम्यान सोयाबीनची पेरणी केली. या नंतर पक्वतेत बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी चार-चार वेळा औषधांच्या फवारण्या कराव्या लागल्या. चांगला दर असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. काही सोयाबीन महापुरात गेला, तर काही सोयाबीनवर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पक्वतेच्या प्रक्रियेत असणाऱ्या सोयाबीनवर तांबेऱ्याचा प्रभाव दिसून येत आहे. सध्या या बाबतची माहिती संकलित केली जात असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

प्रतिक्रिया जून महिन्यात सोयाबीन पेरणी केली. बदलत्या वातावरणामुळे चार-चार वेळा औषधांच्या फवारण्या केल्या. मात्र फारसा फरक पडलेला नाही. तांबेऱ्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार आहे.  -संदीप खामकर, सोयाबीन उत्पादक शेतकरी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT