Soybean area likely to increase in Nanded
Soybean area likely to increase in Nanded 
मुख्य बातम्या

नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर सोयाबीनचे क्षेत्र प्रस्तावित आहे. परंतु यात आणखी वाढ होऊन कपाशीचे क्षेत्र तीस ते चाळी टक्क्यांनी घटण्याची शक्यता कृषी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. 

खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ होऊन तब्बल चार लाख क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी कृषी विभागाने प्रस्तावित केली आहे. तर कपाशीच्या क्षेत्रात यंदा दोन लाख साठ हजार हेक्टरवरून २ लाख ३० हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र यात मोठी घट दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्वच भागांतील शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी केली आहे. या खरेदीवरून कृषी विक्रेत्यांना शेतकऱ्यांनी कपाशी पिकाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. अनेक भागांत कपाशीच्या पाकिटांची विक्री तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत घटल्याचे दिसून आले आहे. यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पुन्हा एकदा सोयाबीनच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ  मागील पाच वर्षांच्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात सोयाबीनच्या पेऱ्यात तब्बल ९० हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली होती. तर कपाशी मात्र दोन लाख साठ हजार हेक्टरवरून २ लाख ३० हजार हेक्टरवर लागवड होईल, असे वर्तविण्यात आले होते. परंतु कपाशीच्या लागवडीत यापेक्षाही अधिक घट होइल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

बाजारात यंदा कपाशी पाकिटाच्या विक्रीमध्ये घट दिसून आल्याने जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे. - दिवाकर वैद्य, बियाणे विक्रेता, नवा मोंढा नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT