crop damage
crop damage  
मुख्य बातम्या

सोयाबीन, कापसाचे मोठे नुकसान

टीम अॅग्रोवन

पुणे ः राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडत आहे. विदर्भातील जोरदार पाऊस होत आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे सर्वाधिक ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारी (ता.१०) राज्यात बहुतेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली.  पावसामुळे कापूस, सोयाबीन, भात, ऊस पिकांचे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले.  गेल्या तीन ते चार दिवसांपासून विदर्भात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. त्यानंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणातही तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. कोकणात पडत असलेल्या पावसामुळे भात काढणी खोळंबण्याची शक्यता आहे. कुलाबा, राजापूर, दोडामार्ग, सावंतवाडी, वैभववाडी परिसरात पावसाच्या चांगल्याच सरी पडल्याने भाताचे नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांना आहे. सध्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून ढगाळ हवामानासह ऊन पडत आहे. मात्र, शनिवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ हवामानासह मेघगर्जनेसह तुरळक सरी पडल्या. या पावसामुळे भात पट्यातील पिकांना दिलासा मिळत असला तरी खरिपातील पिकांसाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. नगर, नाशिक, कोल्हापूर, पुणे भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. तर अकोले येथे ४२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत वादळी पाऊस झाला. पाटोदा, कन्नड, जालना, लोहापूर, सेलू, परांडा येथे पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे सोयाबीन पिकांची काढणी खोळंबल्या असून शेतीकामांची गती मंदावली आहे. विदर्भातही सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांतील अनेक भागात पावसाच्या चांगल्याच सरी पडल्या. तर बटकुली, चांदूरबाजार, मूल, कोर्ची, गोंदिया, शेगाव, तिवसा, वरूड, पवनी या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या असून तूर, कापूस पिकांना काहीसा दिलासा मिळाला.

शनिवारी (ता.१०) सकाळी आठ वाजेपर्यंत  झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये  (स्त्रोत, हवामान विभाग) मध्य महाराष्ट्र : अकोले ४२, वडगाव मावळ ९.६. मराठवाडा : कन्नड ५६, आष्टी २८, पाटोदा ३९, भूम ६१, सेलू ५९. विदर्भ : ब्रह्मपुरी १७.७, जेवती १८, सिंदेवाही १७.५,अरमोरी ३०, देवरी १०.७, नरखेडा १६.१, आर्वी ११.५, आष्टी १०.२, खारंघा १४.३, सेलू १६.६, वर्धा १६.४, पांढरकवडा १५.३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT