पेरण्या खोळंबल्या; जोरदार पावसाची प्रतीक्षा
पेरण्या खोळंबल्या; जोरदार पावसाची प्रतीक्षा 
मुख्य बातम्या

पेरण्या खोळंबल्या; जोरदार पावसाची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहेत. पूर्वेकडील पट्ट्यात ढगाळ हवामान आहे. या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा असून, खरीप पेरण्या खोळंबल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी केली होती. मात्र ऐन हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणेत यंदाही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली असल्याची स्थिती आहे. येत्या दहा ते बारा दिवसांत पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची शक्‍यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणी असतानाही बॅंकेकडून कर्ज घेऊन खरीप हंगामासाठी लागणाऱ्या निविष्ठांची खरेदी, नांगरणीची कामे केली. त्यामुळे पाऊस झाला असता, तर शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली असती, मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरल्याचे दिसून येते. अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची गरज आहे. दमदार पाऊस झाल्यास सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पूर्वेकडील शिरूर, खेड, बारामती, इंदापूर, दौंड, हवेली तालुक्‍यांत पेरण्या होण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांत अनेक शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका टाकल्या आहेत. या भागात मधूनमधून पाऊस बरसत आहे. त्यामुळे रोपवाटिकांना जीवदान मिळत आहे. सध्या रोपवाटिकेतील भातरोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु येत्या दहा ते पंधरा दिवसांत या रोपांची पुनर्लागवड होण्याची गरज आहे. त्यासाठी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. जोरदार पाऊस झाल्यास शेतात चिखलणी करून भात रोपांची वेळेवर लागवड होणार आहे. परंतु उशिराने पाऊस झाल्यास उशिरा लागवडीमुळे उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT