कारखाना
कारखाना  
मुख्य बातम्या

सहा कारखान्यांची धुराडी थंडावली

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांतील यंदाच्या गाळप हंगामात सहभाग घेतलेल्या २३ साखर कारखान्यांपैकी सहा साखर कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. त्यामध्ये बीड, नंदुरबारमधील प्रत्येकी दोन, तर जालना व जळगावमधील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे.  यंदाच्या ऊस गाळप हंगामात औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील प्रत्येकी पाच, बीडमधील सात, जळगाव व नंदूरबारमधील प्रत्येकी तीन साखर कारखान्यांचा समावेश होता. सर्व २३ साखर कारखान्यांनी २१ मार्चअखरेपर्यंत ८२ लाख १४ हजार ९२८ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.४४ टक्‍के साखर उताऱ्याने ८५ लाख ७५ हजार ७१८ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. नंदुरबार जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी  ९ लाख ९९ हजार १०८ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.४ टक्‍के साखर उताऱ्याने १० लाख ३९ हजार १४२ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले.  जवळपास साडेचार महिने चाललेल्या गाळप हंगामानंतर नंदुरबारमधील सातपुडा तापी व आदिवासी सहकारी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अनुक्रमे १० व २० मार्चला गुंडाळला आहे.  जळगाव जिल्ह्यात यंदा तीन साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. या कारखान्यांनी ४ लाख ५१ हजार ९०७ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.८१ टक्‍के साखर उताऱ्याने ४ लाख ४३ हजार ३२१ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. या तीन कारखान्यांपैकी संत मुक्‍ताबाई शुगर ॲँड एनर्जी या १ नोव्हेंबर २०१८ ला गाळप सुरू झालेल्या कारखान्याचा हंगाम १७ मार्चला आटोपला आहे. जालना जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी १९ लाख ७६ हजार ७४ टन उसाचे गाळप करत सरासरी ११.०१ टक्‍के साखर उताऱ्याने २१ लाख ७६ हजार ११० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. या पाच कारखान्यांपैकी रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम १९ फेब्रुवारीलाच उरकला आहे.  बीड जिल्ह्यातील सात कारखान्यांनी यंदा ३२ लाख ५४ हजार ६१२ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.०५ टक्‍के साखर उताऱ्याने ३२ लाख ७० हजार २१० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. या सात साखर कारखान्यांपैकी जय महेश एनएसएल व अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम अनुक्रमे १९ व ३ मार्चला गुंडाळला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी १५ लाख ३३ हजार २२५ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.७४ टक्‍के साखर उताऱ्याने १६ लाख ४६ हजार ९३५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT