नगर जिल्हा परिषदेत शुकशुकाट 
नगर जिल्हा परिषदेत शुकशुकाट  
मुख्य बातम्या

नगर जिल्हा परिषदेत शुकशुकाट 

टीम अॅग्रोवन

नगर ः निवडणूक जाहीर होताच जिल्हा परिषदेकडे पदाधिकारी व सदस्यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे त्यांच्या कक्षात आज शुकशुकाट होता. त्यांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाल्याने वाहनतळावरील वाहनांची गर्दीही कमी झाली होती. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींचे कक्ष नेहमी कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वर्दळीने गजबजलेले असतात. निवडणूक जाहीर होताच आज पदाधिकारी जिल्हा परिषदेत आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कक्षांसमोर नेहमीची वर्दळ नव्हती. विविध कामे घेऊन येणारे सदस्य, पंचायत समित्यांचे पदाधिकारी व सदस्यही दिसले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट होता. 

अनेक अधिकारी व कर्मचारीही निवडणुकीच्या कामात सहभागी झाले असल्याने, त्यांचे कक्षही रिकामे होते. अभ्यागतांना ‘साहेब नाहीत, ‘साहेब मीटिंगला गेले आहेत,’ असेच सांगण्यात येत होते. ‘साहेब’ नसल्याने कर्मचारीही निवांत होते. काही कर्मचाऱ्यांमध्ये राजकीय गप्पा रंगल्या होत्या. डॉ. सुजय विखे पाटील यांचे काय होणार, अशी विचारणाही केली जात होती. 

अधिकारी निवडणुकीच्या कामात  जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी निवडणुकीच्या कामांत सहभागी झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीबाबत होणाऱ्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार जात आहेत. मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमाकांत काटमोरे आदी अधिकाऱ्यांबरोबरच अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात सहभागी झाले आहेत. पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांवरही निवडणुकीच्या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT