Shortage of subsidized seeds in Yavatmal
Shortage of subsidized seeds in Yavatmal 
मुख्य बातम्या

अनुदानित बियाण्यांचा यवतमाळमध्ये तुटवडा

टीम अॅग्रोवन

यवतमाळ : जमिनीत ओलाव्याच्या परिणामी यावर्षी जिल्ह्यात रब्बीखालील क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. परिणामी, जिल्ह्यात बियाण्यांचे नियोजन बिघडले आहे. शेतकऱ्यांकडून महाबीज त्यातही अनुदानित बियाण्यांना मागणी वाढल्याने त्याचा मोठा तुटवडा जिल्ह्यात निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे खासगी बाजारपेठेत बियाण्यांचा तुटवडा असल्याचे सांगत दुप्पट दराने महाबीज बियाण्यांची विक्री केली जात आहे.  

यावर्षीच्या हंगामात पावसाळा वाढला. परिणामी, शेतात ओलावा असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी क्षेत्रात वाढीचा निर्णय घेतला. त्यानुसार कृषी विभागाने देखील रब्बी लागवड क्षेत्र दुपटीने वाढीच्या अपेक्षेने त्यानुसार नियोजन केले आहे. जिल्ह्यात रब्बी हरभरा लागवड क्षेत्र ९९ हजार हेक्‍टरचे आहे. यावर्षी मात्र ते दुपटीने वाढत १ लाख ९१ हजार हेक्‍टरवर पोचण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार बियाणे, खते व इतर निविष्ठांचे नियोजन करण्यात आले. 

महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ तसेच खासगी कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात बियाणे पुरवठा केला जात आहे. यातील महाबीजचे राजविजय २०३ तसेच जॅकी ९२१८ हे दोन वाण दहा वर्ष कालखंडातील आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. बाजारात विना अनुदानित बियाणे (तीस किलो बॅग) २१०० रुपयांना विकल्या जात आहे. 

अनुदानित बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना अवघे १३५० रुपये प्रती ३० किलो बॅगसाठी द्यावे लागतात. बियाणे खर्चात मोठी बचत होत असल्याने शेतकऱ्यांकडून महाबीज त्यातही अनुदानित बियाण्यांना मागणी वाढल्याने त्याचा मोठा तुटवडा जिल्ह्यात निर्माण झाला आहे. एका शेतकऱ्याला एका सातबाऱ्यावर एक बॅग याप्रमाणे अनुदानित बियाणे मिळते. परंतु, बाजारातून हे बियाणेच गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT