Shab-e-Barat, Ambedkar Jayanti on pray at homeः Sharad Pawar
Shab-e-Barat, Ambedkar Jayanti on pray at homeः Sharad Pawar 
मुख्य बातम्या

शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच प्रार्थना करा ःशरद पवार 

टीम अॅग्रोवन

मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला असून सर्वांनी संचारबंदीचे नियम पाळा. सामाजिक अंतर ठेवा, असा सल्ला देत येणाऱ्या ‘शब-ए-बारात’ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवेळी घराबाहेर पडू नका, घरात राहूनच प्रार्थना करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी (ता. २) केले आहे. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर श्री. पवार यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला. दिल्लीतील मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये एक ‘कोरोना’चा रूग्ण होता. यामुळे जमातमधील अनेकांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. येणाऱ्या ८ व ९ एप्रिलच्या दरम्यानची रात्र ही शब-ए-बारात आहे. त्यावेळी मुस्लीम सामाजाची विशेष नमाज असते. पण, ‘कोरोना’चा फैलाव टाळण्यासाठी सर्वांनी घरात राहूनच नमाज अदा करावी. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवेळी घराबाहेर पडून गर्दी करू नका. यामुळे ‘कोरोना’चा फैलाव वाढण्याची शक्यता आहे. घरात राहूनच या संकटापासून मुक्ती व्हावी, अशी प्रार्थना करण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले. 

दिल्लीच्या मरकजमध्ये देश-विदेशातून हजारो तबलिगी जमातचे लोक धार्मिक कार्यक्रमासाठी जमा झाले होते. हा कार्यक्रम लॉकडाऊनच्या पूर्वीच आयोजित करण्यात आला होता. पण, या ठिकाणी विदेशातूनही लोक आल्याने त्यातील कोणालातरी ‘कोरोना’ची लागण झाली होती. त्याद्वारे जमातमधील इतरांनाही त्याची लागण झाली. लॉकडाऊनपूर्वीच त्यातील काही जण आपापल्या घरी परतले होते. पण, मरकजमध्ये रुग्ण आढळल्याने देशभरात खळबळ माजली आहे. विविध राज्यातील लोक यामध्ये सहभागी असल्याने सर्व राज्यातील जिल्हा प्रशासनाने मरकजला जाऊन आलेल्यांनी समोर येत माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. त्यामुळे शब-ए-बारात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवेळी गर्दी न करता घरात राहूनच प्रार्थना करा व जे निजामुद्दीन येथे घडले ते घडू देऊ नका, असे आवाहन ही श्री. पवार यांनी सर्वांना केले आहे. 

गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन नको ः पवार  तसेच संचारबंदीच्या काळातही अनेक जण रस्त्यावर फिरत आहेत. काही ठिकाणी सामाजिक अंतर ठेवले जात नाही. यामुळे आपल्याच जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिस व प्रशासनाला सहकार्य करुन स्वतःची व परिवाराची काळजी घ्या. गर्दी होईल अशा कार्यक्रमांचे आयोजन टाळा, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT