Sending crop damage report in Paganri area
Sending crop damage report in Paganri area  
मुख्य बातम्या

`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल पाठवणार`

टीम अॅग्रोवन

पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा, बारा दिवसांपासून रोजच पडणाऱ्या पावसाने सोयाबीनसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी जिल्हा कृषी अधिक्षक रविंद्र माने यांच्या पथकाने केली. या पीक नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून पंचनामे करण्याबाबत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती माने यांनी दिली.

उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र कांबळे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी सागर बारवकर, भारती एक्सा पीक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी नागेश बोधीधा, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, मंडळ कृषी अधिकारी सोमनाथ साठे, कृषी पर्यवेक्षक सुधीर काशीद, कृषी सहाय्यक मदन तांबारे, संदीप झाडे, शेतकरी डॉ. अरूण नारकर, बाबासाहेब जाधव, चंद्रकांत जाधव, रामलिंग सुरवसे आदी उपस्थित होते.

पथकाने पांगरी, चिंचोली, ढेंबरेवाडी, गौडगाव आदी गावच्या सोयाबीन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पांगरीसह आसपासच्या गावांत सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे. सोयाबीन शेंगांना मोड फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत ‘सकाळ’ व ‘अॅग्रोवन’मधून वृत्त प्रसिध्द केले होते.

जिल्ह्यात सप्टेंबरअखेर ४८८ मी.मी. पाऊस पडतो. मात्र आतापर्यंत ५३२ मि.मी. पाऊस झाला. शेंगा उगवल्या आहेत. काढणी पश्चात नुकसान, उत्पादनापेक्षा ५० टक्के पेक्षा कमी उत्पादन होत असेल, तर शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत चर्चा करून अहवाल सादर करण्यात येईल, असे माने यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांनी क्रॉप इन्सुरंन्स नावाच्या अॅपव्दारे पीक नुकसानीची माहिती, फोटो विमा कंपनीस तत्काळ देणे गरजेचे आहे. किंवा तालुका कृषी कार्यालयास अर्ज करावा. विमा कंपनीचे प्रतिनिधी पाहणी करून जिल्हा स्तरावर अहवाल देतील. - रविंद्र माने, जिल्हा कृषी अधिक्षक, सोलापूर.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT