आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वी
आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वी 
मुख्य बातम्या

आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वी

टीम अॅग्रोवन

हिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी आसामी म्हशीचे रेडकू जन्माला घालण्यासाठी क्लोन तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला. ‘सच-गौरव` असे या नर रेडकाचे नामकरण करण्यात आले आहे.  केंद्रीय म्हैस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. इंद्रजित सिंह यांनी ही माहिती दिली. डॉ. सिंह म्हणाले, की आसामी म्हशी या केवळ ईशान्य भारतातच आढळतात. या म्हशींचा वापर प्रामुख्याने शेती कामासाठी केला जातो. केंद्रीय म्हैस संशोधन संस्थेमध्ये ११ डिसेंबर २०१५ मध्ये क्लोन तंत्रज्ञानाचा वापर करून पहिले नर रेडकू जन्मले होते. या रेडकाचे नाव ‘हिस्सार गौरव` असे ठेवण्यात आले होते. बावीस महिन्यांच्या या नर रेडकाच्या रेतमात्रांचा वापर करून दहा म्हशींमध्ये गर्भधारणा झाली होती. क्लोन तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना संस्थेतील तज्ज्ञ डॉ. पी. एस. यादव म्हणाले, की आसाममधील खन्नापारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील आसामी म्हशीच्या पेशींचे घटक क्लोनिंगसाठी आमच्या प्रयोगशाळेत आणण्यात आल्या. त्यानंतर योग्य तंत्रज्ञानाचा वापर करत मुऱ्हा म्हशीच्या गर्भाशयात या भृणाचे प्रत्यारोपण करण्यात आले. कमी होत जाणाऱ्या जातिवंत जनावरांच्या संवर्धनासाठी तसेच कमी कालावधीमध्ये नवीन पिढी विकसित करण्यासाठी क्लोन तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.  क्लोन तंत्रज्ञानासाठी सिरसा जवळील ‘हाय टेक सच’ डेअरी फार्ममधील मुऱ्हा जातीच्या म्हशीची निवड करण्यात आली होती. या तंत्रज्ञानातून पहिले नर रेडकू २२ डिसेंबर रोजी जन्माला आले. जन्मतेवळी नर रेडकाचे वजन ५४.२ किलो होते. रेडकाच्या रक्त आणि सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. या संशोधनामध्ये डॉ. एन. एल. सेलोकर, डॉ. धर्मेंद्र कुमार, डॉ. आर. के. शर्मा आणि डॉ. सुधीर खन्ना यांचा सहभाग होता. सरोगेटेड मदर क्लोन तंत्रज्ञानाआधारे आसामी रेडकू 'सच-गौरव' याचा जन्म झाला असला, तरी या प्रयोगात सरोगेटेड मदर म्हणून मुऱ्हा म्हशी वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानातून येत्या काळात जातिवंत आसामी रेडे विकसित करून शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती डॉ. यादव यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT