इंदोरी फाटा येथे आज शेतकरी परिषद ः सावंत
इंदोरी फाटा येथे आज शेतकरी परिषद ः सावंत 
मुख्य बातम्या

इंदोरी फाटा येथे आज शेतकरी परिषद ः सावंत

टीम अॅग्रोवन

नगर ः केंद्रात व राज्यात सत्ता बदलली आहे. मात्र नगर जिल्ह्यामध्ये साखर आणि दुधात सम्राट असलेल्यांची सत्ता कायम आहे. शेतकऱ्यांच्या उसाला, दुधाला दर मिळू नये यासाठी हे लोक प्रयत्नशील असतात. त्यांना कोंडीत पकडण्याची व्यूहरचना करण्यासाठी इंदोरी फाटा (ता. अकोले) येथे शुक्रवारी (ता. २८) शेतकरी परिषद होत आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते दशरथ सांवत यांनी सांगितले. सावंत म्हणाले, की इंदोरी फाटा (ता. अकोले) येथे होणाऱ्या शेतकरी परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पक्षाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे, युवकचे अध्यक्ष हंसराज वडघुले, शर्मिला येवले, पूजा मोरे यांची उपस्थिती असेल.  ‘‘मुळात राज्यात व केंद्रात सत्ता बदलली, मात्र नगर जिल्ह्यामध्ये साखर सम्राटाची सत्ता कायम आहे. साखर आणि दूध सम्राट संगनमताने शेतकऱ्यांची लूट करत आहेत. अकोले तालुक्‍यातील साखर कारखान्याने उसाला चांगला दर दिला. मात्र नगर जिल्ह्यामधील अन्य कारखानदार दर देऊ नये म्हणून दबाव टाकत आहेत. केंद्र सरकार दर देत नसल्याचा हे लोक कांगावा करत आहेत. शेतकऱ्यांना लुटून हे लोक त्यांच्या संस्था वाढवत असल्याचा आरोप करत यंदा केवळ नगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी आणि जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी साखर सम्राटांना कोंडीत पकडण्यासाठीची व्यूहरचना करण्यासाठी ही शेतकरी परिषद होत आहे’’, असे सावंत यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT