उमराणे परिसरात  चंदनचोरांचा धुमाकूळ
उमराणे परिसरात  चंदनचोरांचा धुमाकूळ 
मुख्य बातम्या

उमराणे परिसरात चंदनचोरांचा धुमाकूळ

टीम अॅग्रोवन

नाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे येथे व परिसरात गेल्या काही दिवसापासून चंदन चोरांनी धुमाकूळ घातला आहे. गावासह परिसरातील छोट्या मोठ्या दुकानांतील चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत असतानाच शेतकऱ्यांच्या बांधावरील चंदनांच्या झाडे चोरून नेली जात आहेत.  येथील शेतकरी भगवान पुंडलिक देवरे यांच्या शेतातील चंदनाचे झाडे या चोरट्यांनी बुधवार (ता.१३) रात्रीच्या सुमारास तोडून नेले आहे. परिसरात वारंवार चंदनाच्या झाडांची चोरी होत असल्याने चंदनतस्कर टोळी सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुर्वीही या परिसरातील अनेक शेतकऱ्यांची चंदनाचे झाडे तोडून चोरीस गेली असून तक्रारी करुनही चंदन चोरांना पकडण्यात यश येत नसल्याने चोरीचे प्रमाण वाढले आहे. या चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे . १८ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या उमराणे गावासह परिसराच्या सुरक्षेसाठी देवळा पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस चौकी देण्यात आली आहे. या पोलीस चौकीत अवघ्या तीन ते चार पोलीस शिपार्इंची नेमणूक करण्यात आली असून गाव व परिसराची लोकसंख्या बघता पोलिस यंत्रणा अत्यंत तोडकी असल्याने व त्यांचाही वचक नसल्याने चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT