license
license  
मुख्य बातम्या

पेट्रोल-डिझेलच्या उपलब्धतेवरून शेतकऱ्यांची अडवणूक

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर: शेतमालाची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी कृषी विभागाने दिलेल्या वाहतूक परवान्याला महसूल विभागाकडून केराची टोपली दाखविली जात आहे. अनेक ठिकाणी तहसीलदार, पेट्रोलपंप चालक पातळीवर हे परवाने ग्राह्य मानले जात नसल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या नावावर अन्य व्यक्तीच इंधन भरुन नेत असल्याने अनेक पेट्रोलपंप चालकांनी केवळ कृषी विभागाच्या पत्रावर इंधन न देण्याचा पवित्रा घेतला आहे. याचा फटका जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना बसत आहे. 

झुलपेवाडी(ता.आजरा) येथील शेतकरी उद्धव माने यांनी अधिकाऱ्यांनी मांडलेल्या या छळाचा लाईव्ह अनुभव ‘ॲग्रोवन’च्या प्रतिनिधीला सांगितला. शनिवारी (ता.११) श्री. माने आपला शेतमाल बाजारात नेत असतानाच उत्तूरच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी (सर्कल) त्यांचा शेतमाल अडविला. सर्कलना कृषी विभागाने दिलेला परवाना दाखवताच हा परवाना चालत नसल्याचे सांगितले. श्री. माने यांनी पुढील पेट्रोलपंपावर जाऊन शेतमाल वाहतुकीसाठीच्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी प्रयत्न केले. येथेही या परवान्याचा उपयोग झाला नाही. महसुलाच्या अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंप धारकास शेतकऱ्यांकडून हा परवाना ठेवून घेण्यास सांगितले. 

हतबल झालेल्या श्री. माने यांनी संपर्कातील कृषी अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधून त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या अधिकाऱ्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून परवान्याबाबत नेमकी माहिती देण्याचे आश्‍वासन दिले. शेतकऱ्यांच्या नावावर अन्य व्यक्तीच इंधन नेत असल्याने आम्ही पेट्रोल भरण्याची परवानगी देऊ शकत नसल्याने महसुलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तोडगा म्हणून फक्त कृषी विभागाने परवाना दिलेले चारचाकी वाहन आणा फक्त डिझेल देतो पण पेट्रोल देणार नाही अशी भूमिका पेट्रोलपंप चालकांनी घेतली. दोन्ही विभागांनी समन्वयाने काम करावे  शासनाने कृषीच्या कामांना लॉकडाऊन मध्ये सूट दिली आहे. अनेक लहान शेतकऱ्यांकडे चारचाकी वाहन नसल्याने ते स्वत:चा दुचाकीवर शेतमाल ठेवून विकत असल्याची स्थिती आहे. पण महसूल विभागाकडून होणारी अडवणूक ही निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया श्री. माने यांनी नोंदविली. दोन्ही विभागांनी समन्वयाने काही अटी शर्ती लावून तरी दुचाकीसाठी कोणत्याही पेट्रोलपंपावर इंधन उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी यावेळी श्री. माने यांनी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT