chilli crop
chilli crop  
मुख्य बातम्या

‘वनामकृवि’त मिरचीच्या चार वाणांवर संशोधन चाचण्या सुरू 

टीम अॅग्रोवन

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (वनामकृवि) अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन योजनेअंतर्गत मिरचीचे चार वाण विकसित केले जात असून, संशोधन चाचण्या सुरू आहेत. त्यापैकी एक वाण लोणच्यासाठीचे आहे. यंदा विविध भाजीपाला पिकांचे १० हेक्टरवर बीजोत्पादन घेतले जात आहे, अशी माहिती प्रभारी अधिकारी डॉ. विश्‍वनाथ खंदारे यांनी दिली. 

डॉ. खंदारे म्हणाले, की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भाजीपाला संशोधन योजनेअंतर्गत विकसित केलेले भेंडीचा परभणी क्रांती, मिरचीचा परभणी तेजस, तसेच टोमॅटोचा पीबीएनटी -५ आदी वाण विकसित केलेले आहेत. येत्या काळात दर्जेदार भाजीपाला पिकांच्या उत्पादनासाठी मिरची, वांगी, टोमॅटो आदी पिकांवर संशोधन सुरू आहे. विद्यापीठाच्या परभणी येथील प्रक्षेत्रावर १० हेक्टर क्षेत्रावर भेंडी, मिरची, टोमॅटो आदी भाजीपाला पिकांचे बीजोत्पादन तसेच हळद, आले यांचे बेणे उत्पादन घेतले जात आहे. 

भाजीपाल्याचे ५ क्विंटल बियाण्याचे आणि हळद, आल्याचे मिळून ४३० क्विंटल बेणे उत्पादन अपेक्षित आहे. वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये कारले, पारसा दोडका, दुधी भोपळा, टरबूज, खरबूज यांवर तसेच ब्रोकोली, बीट रूट, मेथी, वळी, गवार, ढोबळी मिरची, बडीशेप, ओवा या पिकांचे संशोधन प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. 

हळदीच्या सेलम वाणाची शिफारस  हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी असलेल्या हळदीवर विविध अंगांनी संशोधन करणे आवश्यक आहे. या भागात लागवडीसाठी हळदीच्या सेलम वाणाची तसेच खर्च कमी करण्यासाठी रोपे तयार करून लागवड करण्याची शिफारस करण्यात आली आहे. भाजीपाला संशोधन योजनेअंतर्गत उत्पादित वांगी, भरताची वांगी, टोमॅटो आदी भाजीपाल्याची विक्री सुरू आहे. कांदा आणि लसूण देखील उपलब्ध होईल, असे डॉ. खंदारे यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT