पूरग्रस्त भागाची पाहणी करताना वडनेरे समितीचे सदस्य
पूरग्रस्त भागाची पाहणी करताना वडनेरे समितीचे सदस्य 
मुख्य बातम्या

वडनेरे समितीचा पुराबाबतचा अहवाल लवकरच होणार शासनाला सादर

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर  : पूर येण्याच्या कारणांचा तातडीने अभ्यास करून याबाबतचा अहवाल तीन ते चार महिन्यांत शासनाला सादर करणार असल्याची माहिती वडनेरे समितीचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे यांनी दिली. दक्षिण महाराष्ट्रात पूर नेमक्या कोणत्या कारणांमुळे येतो व त्यावर काय उपाय अपेक्षित आहेत. याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने वडनेरे समिती नियुक्ती केली आहे. या समितीने मंगळवारी दुपारनंतर विविध भागांचा अभ्यास केला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.

या समितीने नृसिंहवाडी, शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यांमध्ये पाहणी केली. त्यानंतर समिती कोल्हापुरात दाखल झाली. येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांच्याकडून माहिती घेतली.

नेमकी ‘रेड लाइन’ आणि ‘ब्लू लाइन’ कोठे आहे याचे नकाशेही त्यांनी पाहिले. आजपर्यंत आलेल्या पुराची माहिती त्यांनी घेतली. कोठे पडझड झाली? किती मिलिमीटर पाऊस झाला? यावरून आजपर्यंत झालेल्या पावसाची आणि या वर्षी झालेल्या पावसाची तुलना केली. पूर येण्यासाठी कोणती कारणे महत्त्वाची ठरली? धरणांमधील पाणीसाठा आणि त्याचा विसर्ग, अतिवृष्टी यांचीही माहिती बैठकीत घेतली गेली. दुपारनंतर समितीने राजाराम बंधाऱ्यावर पाहणी केली. तेथे किती उंचीवर पाणी होते? विसर्ग किती होता याची माहिती श्री. बांदिवडेकर यांच्याकडून घेतली.

जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव (निवृत्त) आणि समितीचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे, जलसंपदा विभागाचे सचिव आर. आर. पवार, निवृत्त सचिव व्ही. एम. कुलकर्णी, प्रदीप पुरंदरे (औरंगाबाद), शास्त्रज्ञ डॉ. आर. सी. पाटील, मंत्रालयातील अभियंता रोहित पोळ, सांगलीचे अधीक्षक अभियंता श्री. गुणाले आदींचा दौऱ्यात समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT