Report the information of the outsiders to the Administration: Collector Mandhre
Report the information of the outsiders to the Administration: Collector Mandhre 
मुख्य बातम्या

बाहेरून आलेल्यांची माहिती प्रशासनास कळवा ः जिल्हाधिकारी मांढरे

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नाशिककरांच्या दृष्टीने येणारे पंधरा दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत; त्यामुळे सर्वांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करावे. त्याचप्रमाणे मालेगावमध्ये असलेल्या दाट लोकवस्तीमुळे या रोगाचा प्रसार होण्याचे संभाव्य प्रमाण अधिक असल्याने नागरिकांनी परदेश, परराज्य अथवा पर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची माहिती तात्काळ प्रशासनास देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे. 

जिल्ह्यात २८ मार्च रोजी पहिला ‘कोरोना’ बाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर आजपर्यंत ती संख्या वाढत गेली. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी सतर्क राहून घरातच थांबणे गरजेचे आहे. यासाठी जीवनावश्यक किंवा अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्यावर गर्दी करणे, विनाकारण लॉकडाऊन कालावधीत फिरणे या गोष्टी टाळाव्यात. या विषाणूंचा प्रादुर्भाव आपल्याकडे उशिराने झाल्यामुळे अजून देखील सर्व परिस्थिती आपल्या नियंत्रणात आहे. 

या आपत्कालीन परिस्थितीमध्ये महसूल, पोलिस, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका यासर्व यंत्रणा अतिशय उत्कृष्टपणे उपाययोजना करून आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. त्याचप्रमाणे विशेष करून मालेगावमध्ये यंत्रमाग प्रमाण अधिक असल्याने अनेकांची फुप्फुसांची क्षमता कमी आहे. 

त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी टीबीचे रूग्ण जास्त आहेत, तेथे या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगची सर्व नियम पाळणे अत्यावश्यक आहे. जे कोणी संचारबंदी कालावधीत नियमांचा भंग करेल त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे या सर्व परिस्थितीतून सुखरूपपणे बाहेर पडण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT