Registration of gram sale started in 11 villages of Nanded district
Registration of gram sale started in 11 villages of Nanded district 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यातील ११ गावांत हरभरा विक्रीची नोंदणी सुरू

टीम अॅग्रोवन

नांदेड  : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हरभरा विक्री नोंदणीसाठी खरेदी केंद्रांवरील गर्दी टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर चार तालुक्यांतील ११ गावांत ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर नोंदणी करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. अन्य तालुक्यांत देखील या पद्धतीने लवकरच शेतकरी नोंदणी सुरु होईल, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

‘नाफेड’तर्फे राज्य पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ, ‘महाएफपीसी’ अंतर्गत जिल्ह्यात सबएजंट संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्यांची १५ खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. हरभऱ्याचा हमीभाव प्रतिक्विंटल ४ हजार ८७५ रुपये आहे. मात्र, खुल्या बाजारात त्यापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत. 

सद्यःस्थितीत सबएजंट संस्थांकडे सोयीसुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे शेतक-यांच्या शेतमालाची नोंदणी आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नोंदणी केल्यास कोरोना संसर्ग टाळण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनाही ते सोईचे ठरेल. या बाबी विचारात घेऊन शासनाने आपले सरकार सेवा केंद्रांत नोंदणीसाठी परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांचे आधार ओळखपत्र, ऑनलाइन पीक पेरा असलेला ७-१२ उतारा, वैयक्तिक संगणकीकृत पेरा प्रमाणपत्र, आधार क्रमांक संलग्न बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाप्रत व बँक खात्याशी जोडलेला भ्रमणध्वनी क्रमांक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. 

नोंदणीवेळी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यासाठी पोलिस पाटील, सरपंच, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आदी यंत्रणांनी सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी दिले.  ११ गावांत नोंदणीची कार्यवाही सुरु 

नांदेड जिल्ह्यात सध्या प्रायोगिक तत्त्वावर गवंडगाव (ता.देगलूर), कासराळी (ता.बिलोली), मनाठा, निवघा, तळणी, तामसा (सर्व, ता. हदगाव), दिगडी (एम), कोठारी (चि.), मांडवा (कि.), मांडवी,सारखणी (सर्व ता.किनवट) येथील आपले सरकार सेवा केंद्रांवर नोंदणीची कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी येत्या दोन-तीन दिवसांत नोंदणी सुरु होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT