rahuri vidyapeeth
rahuri vidyapeeth  
मुख्य बातम्या

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ निलंबित 

टीम अॅग्रोवन

नगर ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी बुधवारी सायंकाळी ही कारवाई केल्याचे पत्र काढले. निलंबनाचे कारण मात्र गुलदस्तात आहे. कुलसचिव पदाचा कारभार महानंद माने यांच्याकडे देण्यात आला आहे. 

दरम्यान, अधिकार नसताना कारवाई केली आहे. नियुक्ती प्राधिकारी व शिस्तभंगविषयक प्राधिकारी आपण असून, निलंबन आदेश आपल्या स्तरावरून द्यावेत, अशी विनंती करणारे पत्र वाघ यांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांना दिले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील असमन्वय या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आला आहे. 

गतवर्षीच्या कोरोना काळात शेतकऱ्यांसाठी भरीव काम केल्याने कृषी विभागाकडून गौरविलेले अकोले येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव पदावर गेल्या वर्षी जूनमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा अजून दोन महिन्यांचा कालावधी असतानाच कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले व त्यांचा पदभार येथील महानंद माने यांच्याकडे देण्यात आला. वाघ यांच्या निलंबनाचे मुख्य कारण मात्र गुलदस्तातच आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रात असलेल्या सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील एक प्रकरण, माहिती अधिकार व अन्य काही कारणाने वाघ यांना मागील काळात कारणे दाखवा नोटिसा दिल्या होत्या. शिस्तभंगानुसार कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात असले, तरी निलंबनासाठी लागणारे गंभीर कारण मात्र स्पष्ट केले नसल्याचे दिसत आहे. याबाबत कोणी बोलायलाही तयार नाही.  डॉ. पाटील दोन महिन्यांपूर्वीच कुलगुरू झाले आहे. संशोधन व अन्य बाबीत सुधारणा होण्याऐवजी वाघ यांचे अचानक निलंबन झाल्याने विद्यापीठात खळबळ उडाली आहे. ‘‘वाघ यांच्यावर कुठलेही गंभीर कारण नसताना केवळ जाणीवपूर्वक टार्गेट करून कारवाई केली आहे. त्यामुळे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेटून विद्यापीठातील वस्तुस्थिती सांगणार आहे,’’ असे शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी सांगितले.  प्रतिक्रिया  मी वर्षभरात विद्यापीठासाठी भरीव काम केले आहे. माझ्या काळात अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली काढली, प्रलंबित अहवाल शासनाला सादर केले. विद्यापीठाच्या जमिनीचे रेकॉर्ड अद्ययावत केले. यांसह विविध बाबींवर काम केले असताना व कोणतीही गंभीर चूक नसताना केवळ टार्गेट करून चुकीची कारवाई केली आहे. चुकीच्या कारवाईबाबत मी शासनाला कळवले आहे.  - मोहन वाघ, कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT