Reduction in area of ​​kardai in Jat taluka
Reduction in area of ​​kardai in Jat taluka 
मुख्य बातम्या

जत तालुक्यात करडईच्या क्षेत्रात घट

टीम ॲग्रोवन

सांगली : जत तालुक्यात कोरडवाहू पीक म्हणून करडईचे उत्पादन घेतले जाते. मात्र, त्यास अपेक्षित दर मिळत नाही. त्यातच वाढत्या खर्चामुळे तालुक्यातील करडई पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

जत तालुक्यात पारंपरिक पध्दतीने दरवर्षी सरासरी एक हजार हेक्टर क्षेत्रावर करडईचे पीक घेतले जाते. सरासरी क्षेत्र २३६८ हेक्टर आहे. यंदा करडईची ३२१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे उत्पादनातही घट झाली आहे. दरवर्षी करडईचे दर वाढतील, या आशेने शेतकरी करडईची लागवड करतात. परंतु, दरांत वाढ होत नाही. त्यामुळे शेतातील उत्पादन खर्चही निघणे अवघड झाला आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

यंदा पावसाने दडी मारल्याने करडई पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. त्यात सातत्याने हवामानात बदल होत असल्याने करडईवर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून करडईचे दर २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळतो आहे. लागवड करण्यासाठी एकरी १० ते १२ रुपये खर्च होत आहे.

गेल्यावर्षी करडईला सरासरी ३ हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला. यंदा पीक वाढीच्या दरम्यान पाऊस झाला नाही. त्यातच पाण्याच्या कमतरतेमुळे करडई पिकाचे उत्पादन घटले. परिणामी करईडच्या क्षेत्रात घट झाली. यंदाच्या हंगामात सरासरी ४ ते ५ हजारांचा दर मिळण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT