Read the 'No' of commercial banks in crop lending
Read the 'No' of commercial banks in crop lending 
मुख्य बातम्या

पीक कर्जवाटपात व्यापारी बॅंकांचा ‘ना’चाच पाढा

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्याअखेर खरीप पीक कर्ज पुरवठ्यात केवळ तीन टक्क्यानेच वाढ झाली आहे. तर, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात पुन्हा हात आखडताच घेतला आहे. त्यामुळे या बँकांनी कर्ज पुरवठ्यात पुन्हा एकदा ''ना'' चाच पाढा गिरविला आहे. 

मिळालेल्या उद्दिष्टानुसार कर्ज पुरवठा करण्याचा प्रश्न लटकलेलाच आहे. मराठवाड्यातील जिल्हा सहकारी, व्यापारी तसेच ग्रामीण बँकांना ११ हजार ९०४ कोटी ४४ लाख ७ हजार रुपये चालू खरीप हंगामासाठी पीक कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सर्व बँकांनी १३ जुलै अखेरपर्यंत केवळ २९.४३ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. ६ लाख ८० हजार ५६६ शेतकऱ्यांना ३५०३ कोटी ३१ लाख ४१ हजार रुपयांचा कर्जपुरवठा केला. ६ जुलै अखेरपर्यंत मराठवाड्यातील सर्व बँकांनी मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत २६ टक्केच कर्ज पुरवठा केला. 

व्यापारी बँकांना चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सर्वाधिक ८१६६ कोटी ५ लाख ६५ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट होते. व्यापारी बँकांनी १३ जुलै अखेरपर्यंत केवळ १४.१६ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. १ लाख १९ हजार ४६७ शेतकऱ्यांना ११५६ कोटी ६० लाख ९७ हजार रुपये कर्ज पुरवठा केला. 

कर्जवाटपात जिल्हा बॅंका आघाडीवर

जिल्हा बँकांना मिळालेल्या २१०१ कोटी ६५ लाख ६८ हजार रुपये कर्ज पुरवठ्याच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ७७.२४ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली. ४ लाख ६१ हजार ४१८ शेतकऱ्यांना १६२३ कोटी २६ लाख ५६ हजार रुपयांचा कर्ज पुरवठा केला. तर, ग्रामीण बँकेने मिळालेल्या १६३६ कोटी ७२ लाख ७४ हजार रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत ४४.२० टक्के उद्दिष्टपूर्ती केली. ९९ हजार ६८१ शेतकऱ्यांना ७२३ कोटी ४३ लाख ८८ हजार रुपयांचा कर्जपुरवठा केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT