राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या  सोहळ्यासाठी सिंदखेडराजा सज्ज
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या सोहळ्यासाठी सिंदखेडराजा सज्ज 
मुख्य बातम्या

राजमाता जिजाऊ साहेबांचा आज जन्मोत्सव; सोहळ्यासाठी सिंदखेडराजा सज्ज

टीम अॅग्रोवन

सिंदखेडराजा, जि. बुलडाणा : राजमाता माॅंसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी आज (ता.१२) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सुर्योदयी लखुजी राजे जाधव यांच्या राजवाड्यात राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी विधिवत पूजन केले जाणार आहे. दरवर्षी या सोहळ्याला लाखो जिजाऊ भक्त येत असतात. यानिमित्ताने पहाटेलाच शासनाच्यावतीने पूजन होणार आहे. याशिवाय जिजाऊ भक्तही उपस्थित राहणार आहेत. दुपारी येथील जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघाच्या वतीने भव्य सोहळा होत आहे. या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण केले जाईल. शिवाय देशभरातील जिजाऊ भक्तांना मार्गदर्शन केले जाणार आहे. रविवारी मुख्य सोहळ्याची सुरुवात जिजाऊ जन्मस्थळ राजवाडा येथे मराठा सेवा संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जोडप्यांद्वारे महापूजनाने होईल. सकाळी ७ वाजता वारकरी दिंडी निघेल. सकाळी नऊ वाजता पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त ३ ते १२ जानेवारी या काळात सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. जिजाऊ सृष्टीवर आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात मराठा विश्वभूषण हा सर्वोच्च पुरस्कार यंदा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांना तर जिजाऊ पुरस्कार कौन बनेगा करोडपती विजेत्या बबिताताई ताडे यांना दिला जाईल. मराठा कृषिभूषण पुरस्कार पांडुरंग डोंगरे (जालना) तर मराठा क्रीडा भूषण पुरस्कार श्रीमती ऋतुजा भोसले, प्रणाली घोगरे यांचा पुरस्कार देऊन सन्मानित केल्या जाईल. तिथीनुसार वंशजांनी केले पूजन राजमाता माॅंसाहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी पौष पौर्णिमेला तिथीनुसार साजरा केला जातो. त्यानुसार शुक्रवारी राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात साजरा करण्यात आला. तिथीनुसार हा जन्मोत्सव सोहळा त्यांच्या वंशजांनी साजरा केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातीस परवानगीची घोषणा फसवीच

Sugar Market : दर नियंत्रणासाठी साखरविक्री कोटावाढीचा केंद्राचा सपाटा

Hapus Mango Export : रत्नागिरीतून एक टन हापूस लेबनानला रवाना

Heat Wave : कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

SCROLL FOR NEXT