Rainfall forecast in Konkan, Central Maharashtra
Rainfall forecast in Konkan, Central Maharashtra 
मुख्य बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या आज (ता. ११) विजा, मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा तर विदर्भात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ उद्यापर्यंत (ता. १२) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ही प्रणाली ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या दोन्ही प्रणालींच्या दरम्यान पूर्व-पश्चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. राजस्थानातून परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर तीनच दिवसांत मॉन्सूनने संपूर्ण उत्तर भारतातून परतला आहे. माघारीच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने मंगळवारपर्यंत (ता. १२) मध्य प्रदेश, झारखंड, बिहारचा बहुतांश भाग, गुजरात, छत्तीसगड आणखी काही भाग, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, कोल्हापूर.  विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कोकण : मुंबई, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, सांगली, सोलापूर.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT