विदर्भात वादळी पावसाची शक्यता
विदर्भात वादळी पावसाची शक्यता 
मुख्य बातम्या

विदर्भात वादळी पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे राज्यातील कमी झालेला उन्हाचा चटका पुन्हा वाढणार आहे. सोमवारपर्यंत (ता. २२) कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे. तर पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २०) विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  गेल्या काही दिवसांत वादळी पावसाने हजेरी लावल्याने राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर येथेही तापमान ४२ अंशांवर पाचले, तर नांदेड येथे ४०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन दिवसांपासून राज्यात पूर्वमोसमी पाऊस थांबला असून, मुख्यत: निरभ्र आकाश होते. शुक्रवारी दुपारनंतर गडचिरोलीसह पूर्व विदर्भात हलके ढग जमा झाले होते.  विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती, मराठवाड्यापासून कोमोरीन भागापर्यंत खंडीत झालेल्या वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे असलेली द्रोणीय स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात आज (ता. २०) आणि उद्या (ता. २१) वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.७ (-१.१), धुळे ३६.६, जळगाव ३८.२ (-३.६), कोल्हापूर ३६.७ (-०.३), महाबळेश्वर ३१.५ (-०.४), मालेगाव ३६.४ (-३.९), नाशिक ३५.२ (-२.७), सांगली ३७.५ (-१.१), सातारा ३७.१ (०.३), सोलापूर ३९.५(-१.०), अलिबाग ३०.९ (-१.०), डहाणू ३२.३ (-०.५), सांताक्रूझ ३२.८ (०.०), रत्नागिरी ३३.५ (१.४), औरंगाबाद ३६.५ (-२.३), नांदेड ४०.५ (-०.५), परभणी ३९.५ (-१.०), अकोला ३८.५ (-२.६), अमरावती ३८.४ (-३.०), बुलडाणा ३५.६ (-२.०), बह्मपुरी ४२.१ (१.५), चंद्रपूर ४२.० (०.३), गोंदिया ३८.० (-२.४), नागपूर ३८.० (-२.६), वाशिम ३७.०, वर्धा ३९.५ (-२.१), यवतमाळ ३८.० (-२.७).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT