ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही पावसाचा अंदाज
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही पावसाचा अंदाज 
मुख्य बातम्या

ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमान सरासरीच्या वर गेले असून, राज्यातील थंडी गायब झाली आहे. उद्यापर्यंत (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. रविवारी (ता. १८) सकाळी नागपूर येथे नीचांकी १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ तीव्र कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, आज (ता. १९) त्याची तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत. तर बंगालच्या उपसागरात विषुववृत्तीय हिंदी महासागरामध्ये नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, आज त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. आज (ता.१९) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्‍ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. रविवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.९(२), जळगाव १४.०(-१), कोल्हापूर २२.८(५), महाबळेश्‍वर १७.६(३), मालेगाव १६.२ (२), नाशिक १३.६(०), सांगली २०.५(४), सातारा १९.०(३), सोलापूर २३.५(०), सांताक्रूझ २०.२(-१), अलिबाग २१.३(१), रत्नागिरी २३.३(२), डहाणू २०.७(०), आैरंगाबाद १५.०(१), परभणी १८.४ (२), नांदेड २०.५(५), अकोला १६.६(०), अमरावती १६.८(-१), बुलडाणा १८.० (२), चंद्रपूर २०.०(४), गोंदिया १४.८(-१), नागपूर १४.५(-१), वर्धा १५.५(-१), यवतमाळ १५.४ (-१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT