हवामान अंदाज
हवामान अंदाज  
मुख्य बातम्या

जोर काहीसा ओसरला; मंगळवारपासून पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मध्य कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी येत आहेत. मंगळवारपासून (ता.१७) पावसासाठी पोषक हवामान होण्याचे संकेत असल्याने कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाब क्षेत्र मध्य भारतातील राज्यांमध्ये स्थिरावल्याने विदर्भ, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला. विदर्भातील तळाशी गेलेल्या गोसीखुर्द, तोतलाडोह, उर्ध्व वर्धा धरणात चांगला पाणीसाठा झाला. या धरणातून पाण्याचा विसर्गही करावा लागला. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील धरणांमधून सातत्याने पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी, अधून-मधून येणाऱ्या सरींमुळे पाणलोटातून धरणांमध्ये पाण्याची आवकही सुरूच आहे.   मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ होत असून, मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सकरला आहे. आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. तर उर्वरीत राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर केरळ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने मंगळवारपासून दक्षिण आणि पूर्व भारतातील राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे.   शुक्रवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) : कोकण : सांताक्रुझ ४१, मोखेडा ४३, भिरा ४४, कर्जत १०४, खालापूर ५७, माथेरान ९२, मुरूड ५८, पनवेल ४४, रोहा ४२, सुधागडपाली ४४, तळा ५०, चिपळूण ५३, लांजा ४२, संगमेश्वर ४७, अंबरनाथ ५६, भिवंडी ६५, कल्याण ५५, मुरबाड ११८, शहापूर ४०, ठाणे ७०, उल्हासनगर ६७. मध्य महाराष्ट्र : पाथर्डी २५, श्रीरामपूर २७, भुसावळ ५०, बोधवड ४९, यावल ४५,गगणबावडा ४५, राधानगरी ३२, इगतपुरी ७८, महाबळेश्वर ६३.  मराठवाडा : अर्धापूर २६, उमरी २६.  विदर्भ : चांदूरबाजार ३५, चिखलदरा ७९, धारणी ३१, परतवाडा ३५, भामरागड ६५, एटापल्ली ३०, कोर्ची ३६, मुलचेरा ५१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT