तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज 
मुख्य बातम्या

तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. सोमवारी दुपारनंतर बुलडाणा, अकोला, वाशिमसह पश्‍चिम विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ढग गोळा झाले होते. आज (ता.२५) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सोमवारी (ता. २४) दक्षिण हरियाणा आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र होते. यामुळे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, महाराष्ट्रात तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. विदर्भासह अनेक भागांत ३० अंशांच्या खाली घसरलेले तापमान पुन्हा वाढू लागले आहे. सोमवारी सकाळपर्यंत २४ तासांमध्ये परभणी येथे उच्चांकी ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आजपासून (ता. २५) राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, महाराष्ट्रासह मध्य भारतातील तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.  सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसांत किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.४, जळगाव ३४.०, कोल्हापूर ३०.६, महाबळेश्‍वर २४.४, मालेगाव ३३.४, नाशिक २९.०, सांगली ३०.४, सातारा ३१.१, सोलापूर ३३.५, मुंबई ३२.५, रत्नागिरी ३०.९, डहाणू ३३.३, आैरंगाबाद ३१.८, परभणी ३४.६, नांदेड ३१.०, अकोला ३२.८, अमरावती ३२.४, बुलडाणा ३१.६, चंद्रपूर ३३.०, गोंदिया ३१.४, नागपूर ३१.७, वर्धा ३२.६, यवतमाळ ३२.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT