कृषी रोजगार
कृषी रोजगार 
मुख्य बातम्या

शेती क्षेत्रातील रोजगारासाठी युवकांना प्रशिक्षण देणार : राधामोहनसिंह

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली ः शेती क्षेत्रातील कुशल कामगारांची समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. कृषी आणि संलग्न क्षेत्रातील कामांचे युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी कृषी मंत्रालयाने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयासोबत सामंजस्य करार केल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली.  कृषिमंत्री राधामोहनसिंह म्हणाले, की युवकांना शेती व संलग्न क्षेत्रासंबंधी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण कार्यक्रम हे देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये नियमित स्वरूपात चालतील. यातून युवकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल. सध्या अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम देशातील कृषी विज्ञान केंद्रांध्ये सुरू आहेत. हे कार्यक्रम येणाऱ्या काळात गतिमान केले जातील. तसेच सरकार उत्पादकता वाढ, शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव देणे, शेतीतील धोके कमी करणे आणि शेतीविकासातील इतर पैलूंचे मजबुतीकरण करणे यावर सरकार काम करत आहे.  ‘‘तसेच २०१७-१८ मध्ये २३२० युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी ११६ कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचा फायदा निश्चितच या युवकांना झाला आहे, तसेच स्वयंरोजगाराचे प्रमाणही वाढण्याची गरज आहे आणि कृषी कौशल्य परिषदेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील कौशल्य उणिवा किंवा अंतराचे विश्लेषण होणे गरजेचे आहे,’’ असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT