Rabi sorghum sown on one lakh hectares in the Satara district
Rabi sorghum sown on one lakh hectares in the Satara district  
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात रब्बी ज्वारीची एक लाख हेक्टरवर पेरणी 

टीम अॅग्रोवन

सातारा ः जिल्ह्यातील रब्बी हंगामातील बुधवारअखेर ६९.३३ टक्के पेरणीची कामे उरकली आहे. दुष्काळी माण तालुक्यात सर्वाधिक ३० हजार ५६७ हेक्टर पेरणी झाली आहे. पिकांत शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीला सर्वाधिक प्राधान्य दिले असून, जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १४ हजार ८२३ हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) एक लाख ४८ हजार ९२९ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ६९.३३ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळी माण तालुक्‍यात ३० हजार ५६७ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चारा आणि उत्पादन यामुळे प्रत्येक वर्षाप्रमाणे रब्बी ज्वारीची यंदा सर्वाधिक पेरणी झालेली दिसते. 

रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३९ हजार ९१२ हेक्‍टर असून, त्यापैकी एक लाख चार हजार ५० हेक्‍टर म्हणजेच ७४.८० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८६३ हेक्‍टर असून, १७ हजार ८१४ हेक्‍टर म्हणजेच ६१.७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार ४७२ हेक्‍टर असून, १८ हजार ८८१ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ५४.७७ पेरणी झाली आहे. मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र दहा हजार ९४१ हेक्‍टर असून, सात हजार ४०३ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. कांद्याच्या दरातील तेजीचा परिणाम लागवडी होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कांदा लागवडीस वेग आला आहे. 

आंतरपिक म्हणून कांदा लागवड केली जात असल्याने उत्पादनात वाढ होणार आहे. रब्बी ज्वारी लागवडीचा काळ जवळपास संपत आला असल्याने यापुढे ज्वारी क्षेत्र वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सर्वधारण क्षेत्राइतकी पेरणी होणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या हरभरा, गहू या पिकांच्या पेरण्या केल्या जात आहेत. तसेच पूर्व हंगामी उसाची लागवडीस गती अाली असून गावोगावी ऊस बियाणे प्लॅाट सुरू केले आहेत.

पेरणी झालेले तालुकानिहाय क्षेत्र (हेक्‍टर)  सातारा ः ११,८३१ जावळी ः ६३५४, पाटण ः ११९१५, कऱ्हाड ः ८१९५, कोरेगाव ः १७०२८, खटाव ः १३,८६४, माण ः ३०,५६७, फलटण ः २१,६५१, खंडाळा ः १४,२५३, वाई ः १२,६२३, महाबळेश्वर ः ६४८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT