जळगावात रब्बीमधील मक्याची मळणी सुरू Rabi maize threshing begins in Jalgaon
जळगावात रब्बीमधील मक्याची मळणी सुरू Rabi maize threshing begins in Jalgaon 
मुख्य बातम्या

जळगावात रब्बीमधील मक्याची मळणी सुरू

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात रब्बी हंगामात नोव्हेंबरच्या मध्यात लागवड केलेल्या मका पिकाची मळणी सुरू झाली आहे. मळणीला अलीकडेच सुरुवात झाली आहे. एकरी उत्पादन २२ ते २८ क्विंटल एवढे येत आहे. 

मक्याची लागवड खानदेशात रब्बी हंगामात कमी झाली होती. अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप, वाढता उत्पादन खर्च व बाजारातील कमी दर, पाण्याची अधिक गरज, वन्यप्राण्यांकडून मक्याचे होणारे मोठे नुकसान आदी कारणांमुळे शेतकऱ्यांनी मक्याची लागवड टाळली. परंतु धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, जळगाव, जामनेर भागांत लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली. ठिबकवर अनेकांनी पिकाचे सिंचन केले. काळ्या कसदार जमिनीत पीक जोमात होते.

लष्करी अळी रोखण्यासाठी दोनदा फवारणी घेतली. तसेच दोनदा रासायनिक खतांची निर्देशित मात्राही शेतकऱ्यांनी दिली. यंदा फवारणी, खते, बियाणे यावरच खर्च वाढला. तसेच मका पिकाचे वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान रोखण्यासाठी रखवालदारांची नियुक्ती देखील अनेक शेतकऱ्यांनी केली. यात यंदा मका पिकाला एकरी १५ हजार रुपये किमान उत्पादन खर्च आला आहे. त्यात पूर्वमशागत, बियाणे, लागवडीची मजुरी, दोन फवारण्या, खते, कापणी व मळणीचा खर्च समाविष्ट आहे. 

मक्याचे तापी, गिरणा, अनेर नदीकाठच्या भागात एकरी २२ ते २८ क्विंटल उत्पादन येत आहे. मळणी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहील. १५ तारखेनंतर मळणीला आणखी वेग येईल. यंदा उत्पादन बऱ्यापैकी येत आहे. परंतु बाजारात दर हमीभावापेक्षा कमी आहेत. यामुळे शासकीय किंवा हमीभावात खरेदी लवकर सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. गेल्या वर्षी ही खरेदी जूनमध्ये सुरू झाली होती. यंदा ही खरेदी मे अखेरीस सुरू करावी, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

मक्याची लागवड कमी असल्याने शासकीय खरेदीसंबंधी यंत्रणेवर फारसा ताणही पडणार नाही, असेही जाणकारांचे मत आहे. बाजारात हमीभावापेक्षा ६०० ते ६५० रुपये कमी दर शेतकऱ्यांना मिळत आहे. १८५० रुपये क्विंटल, असा मक्याला हमीभाव आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT