पुण्यातील उपबाजार आवार आजपासून सुरू होणार
पुण्यातील उपबाजार आवार आजपासून सुरू होणार 
मुख्य बातम्या

पुण्यातील उपबाजार आवार आजपासून सुरू होणार

टीम अॅग्रोवन

पुणे : गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेला पुणे बाजार समितीच्या उपबाजारातील फळे-भाजीपाल्याचा व्यापार सुरू होत असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. यामुळे शहरातील फळे-भाजीपाल्याचा पुरवठा होण्यास प्रारंभ होणार आहे.  दरम्यान, भुसार बाजार बुधवार (ता.१५) पासून सुरू झाला असून सुमारे ३१० वाहनांमधून अन्नधान्य आणि कडधान्याची आवक झाली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे गुलटेकडी परिसर प्रशासनाने हॉटस्पॉट म्हणून सील केल्यानंतर मुख्य बाजारासह उपबाजार देखील बंद करण्यात आले होते. कोणतेही पर्याय न देता हे बाजार बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानी बरोबरच ग्राहकांना देखील चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागत होता. या विरोधात ॲग्रोवनने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाने उपबाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्यापासून मांजरी, मोशी, खडकी आणि उत्तमनगर बाजार सुरू होणार असल्याचे प्रशासक देशमुख यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT