परिक्षण
परिक्षण  
मुख्य बातम्या

आटपाडी माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळा प्रस्ताव दुर्लक्षित

टीम अॅग्रोवन

सांगली ः आटपाडी तालुक्‍यात डाळिंब व द्राक्षाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने माती- पाणी परीक्षण प्रयोगशाळा उभारण्याची गरज आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. सहा जुलै २०१८ रोजी प्रस्ताव देऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.  आटपाडी तालुक्‍यात डाळिंब नगदी पिकाचे क्षेत्र दहा हजार हेक्‍टरहून अधिक आहे. निर्यातक्षम डाळिंब प्रत्येक वर्षी आटपाडी तालुक्‍यातील शेतकरी परदेशात पाठवत असतात. काही कोटींची उलाढाल होत असते. दिवसेंदिवस डाळिंब क्षेत्र वाढत आहे. त्याबरोबर द्राक्षाचेही क्षेत्र दोन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दोन्ही नगदी पिकांमुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल चांगली होत असल्याने तालुक्‍याच्या ठिकाणी माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा गरजेची झाली आहे.  माती व पाणी परीक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. काही शेतकरी लांब अंतर असल्याने आर्थिक व वेळेअभावी माती पाणी परीक्षण टाळतात. परिणामी माती परीक्षण न करता उत्पन्न घेतात. यात शेतकऱ्यांचे उत्पादन घटून आर्थिक नुकसानही होत. याचा विचार घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा मिळावी यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे निधी मिळावा यासाठी प्रस्ताव सहा जुलै २०१८ रोजी दिला आहे. मात्र बाजार समितीने दिलेला प्रस्ताव वर्ष झाले तरी अजून मंजूर झालेला नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT