पशुधन विकास अधिकाऱ्यांना पदोन्नती द्या
पशुधन विकास अधिकाऱ्यांना पदोन्नती द्या 
मुख्य बातम्या

पशुधन विकास अधिकाऱ्यांना पदोन्नती द्या

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदोन्नती करावी, या प्रमुख मागणीसाठी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. डी. आर. राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (ता. २५) धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

सरकारच्या धोरणावरही संघटनेच्या सदस्यांनी टीप्पणी केली. मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. मागण्यांबाबत दखल घ्या, अन्यथा आंदोलन तीव्र करावे लागेल, असा इशाराही संघटनेने दिला. 

जिल्हाअंतर्गत बदलीमध्ये तालुकांतर्गत बदली करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करणे, पदोन्नतीधारक सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या विकल्पानुसार संबंधितांची माहिती पशुसंवर्धन विभाग, पुणे विभाग यांना सादर करणे, निवडणूक कामांची जबाबदारी देऊ नये आदि मागण्यांचा समावेश आहे. 

आंदोलनामध्ये संघटनेचे सचिव डॉ. व्ही. एस. केंगले, कार्याध्यक्ष ए. एम. सोनवणे, डॉ. डी. आर. साळुंखे, एच. एस. सय्यद, बी. बी. देशमुख, एम. डी. जाधव, एस. टी. कांबळे, जे. एम. सराफ, सी. सी. भांदुर्गे, डॉ. एम. जे. देशपांडे, पी. बी. नवले, एम. ए. मणेरी, ए. ए. मोहोळे, बी. एन. सरडे, एच. ए. ताकभाते यांच्यासह पशुचिकित्सा संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT