cotton procurement
cotton procurement 
मुख्य बातम्या

कापसाची खरेदी करा : शेतकरी मराठा महासंघ

टीम अॅग्रोवन

जळगावः यंदा कोरोनामुळे कापूस खरेदी केंद्रे बंद होते. कारखानदार, व्यापारी कापसाची खरेदी करत नाहीत म्हणून कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडू द्यायचा काय? खरिपाच्या आधी कापसाची खरेदी करून शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही तर पेरणीवर परिणाम होईल. त्यामुळे सरकारने कापूस तातडीने खरेदी करून शेतकऱ्यांचे गुंतलेले पैसै मोकळे करून द्यावेत, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  ‘‘कापूस खरेदी होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. राज्यातील अडीच लाख शेतकऱ्यांचा कापूस खरेदीअभावी घरातच असून सात हजार कोटी अडकल्याची बाब ‘अॅग्रोवन’ने समोर आणली. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. कापसाच्या पैशावरच खते, बियाणे व अन्य बाबी खरेदी केल्या जातात. कारखानदार व्यापारी कापूस खरेदी करत नाही. सरकारी यंत्रणा याबाबत दखल घेणार आहे की नाही? कापूस खरेदीचे केवळ कागदोपत्री घोडे नाचवले जात आहेत. प्रत्यक्षात कापूस खरेदी मंदगतीने  सुरु आहे. अशीच परिस्थिती राहिली तर खरिपापर्यंत अर्धा कापूस खरेदी होणार नाही. त्यामुळे शासनाने गरजेच्या ठिकाणी खरेदी केंद्रे सुरु करून तातडीने खरेदी करून शेतकऱ्यांचे गुंतलेले पैसै तातडीने मोकळे करून द्यावेत,’’ अशी संभाजी दहातोंडे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याची तातडीने दखल घेतली नाही तर लॉकडाऊन उठल्यानंतर मुख्यमंत्री, पणन मंत्र्यांच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. महासंघातर्फे ‘अॅग्रोवन’चे अभिनंदन   ‘अॅग्रोवन’ने राज्यातील कापूस, तूर, हरभरा खरेदीसह कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्याचे होणारे हाल, अडवणूक आदी समस्या सतत मांडल्या. शेतकऱ्यांची बाजू सतत लावून धरत राज्यातील शेतकऱ्यांसाठी सतत न्यायिक भूमिका घेण्याचे काम ‘अॅग्रोवन’ने केले आहे. त्यामुळे मराठा महासंघ ‘अॅग्रोवन’चे खास अभिनंदन करत आहे, असे संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT