कांदा दरांवरील दबाव वाढला
कांदा दरांवरील दबाव वाढला 
मुख्य बातम्या

कांदा दरांवरील दबाव वाढला

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढत असल्याने अनेक शेतकरी मध्य प्रदेश, गुजरातेत कांदा विक्रीसाठी जात आहेत. यातच दरांवरील दबाव दूर करण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.  कांद्याची आवक मागील महिनाभरापासून स्थिर होती. अशातच या आठवड्यात आवक वाढली आहे. सध्या जळगाव, धुळे, चाळीसगाव, साक्री (जि. धुळे), अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल) येथील बाजारात कांद्याची आवक होत आहे. या बाजारांमध्ये मिळून रोज सरासरी पाच ते साडेपाच हजार क्विंटल कांद्याची आवक सुरू आहे. सर्वाधिक आवक साक्री, जळगाव, अडावद, धुळे येथील बाजारात होत आहे. तर किनगाव, चाळीसगाव बाजारातील आवक कमी झाली आहे. सध्या कमाल दर १६०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. मागील आठवड्यात कमाल दर १८०० रुपयांपर्यंत होता. अर्थातच कमाल दरात क्विंटलमागे २०० रुपयांची घसरण झाली आहे. दरांवरील दबाव वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे. कारण खानदेशात लागवड वाढली असून, यंदा मार्चनंतर अधिकची आवक होईल. त्या वेळेस दबाव कायम राहिला, तर कांदा परवडणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. सध्या कांद्याची आवक जळगाव, चोपडा, भुसावळ, यावल, धुळे, पाचोरा आदी भागातून होत आहे. दर अपेक्षित मिळत नसल्याने अनेक शेतकरी आपल्या कांद्याची पाठवणूक मध्य प्रदेशातील बडवानी, इंदूर व नाशिक जिल्ह्यांतील लासलगावच्या बाजारात करीत आहेत. तेथे कमाल दर २००० रुपयांपर्यंत मिळत आहेत. लाल कांद्याची आवक अधिक आहे. तर पांढऱ्या कांद्याची आवक मात्र नगण्य स्वरूपात होत आहे. कांदा दरांवरील दबाव दूर करण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी शेतकरी आत्माराम पाटील (कापडणे, जि. धुळे) यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT