Presence of rains again after opening in Pune district
Presence of rains again after opening in Pune district 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात उघडिपीनंतर पुन्हा पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन

पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. गेले सात ते आठ दिवस पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाने जोर धरला आहे. शिरूरमधील पाबळ, कोरेगाव भागांत मुसळधार पाऊस पडल्याने ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले होते. काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

सध्या अनेक भागात ढगाळ हवामानाची स्थिती असून, पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अधूनमधून ऊन पडत आहे. जिल्ह्यात दिवसभर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत असला तरी काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडत आहे. त्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळत असून पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस पोषक ठरत आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यात पावसाचा काही प्रमाणात जोर कमी आहे.

उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस आहे. पूर्वेकडील तालुक्यातील शिरूर, दौड, हवेली, पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यात पावसाचा जोर अधिक असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. इंदापूर, बारामती, दौंड भागात जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचले असून ओढे पावसाच्या पाण्याने वाहू लागले आहे.

हवेलीतील पुणे शहरात सर्वाधिक ४७.८ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे पुणे शहरात काही प्रमाणात वाहतूक ठप्प झाली असून रस्ते पाण्याने वाहत होते. जुन्नरमधील बेल्हा, नारायणगाव येथेही जोरदार पाऊस पडला. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असून पिकांची वाढीस हा पाऊस पोषक ठरणार आहे.

पुणे जिल्ह्यातील महसूल मंडळात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः हवेली - पुणे शहर ४७.८, कोथरूड ३.०, खडकवासला २.५, थेऊर ६४.३, उरुळी कांचन ४१.८, भोसरी ७.५, चिंचवड ४.३, कळस १२.३, हडपसर ४०.५, वाघोली २८.५. मुळशी - पौड ४.८, घोटावडे १.३, थेरगाव ३.८. भोर - भोर १.०, नसरापूर १.०, किकवी १.५, वेळू १४.३, संगमनेर १.०. मावळ - तळेगाव २.५, कार्ला २.३, लोणावळा ३.३, वेल्हा - वेल्हा, पाणशेत, विंझर, अंबावणे १.०. जुन्नर - जुन्नर ९.०, नारायणगाव ३२.३, वडगाव आनंद २८.०, निमूलगाव २०.५, बेल्हा ३३.५, राजूर ११.३, डिंगोरे १९.८, आपटाळे १०.५, ओतूर ३.८. खेड -  वाडा ६.८, राजगुरूनगर १०.३, कुडे ८.५, पाईट १.०, चाकण २.५, आळंदी २.५, पिंपळगाव ३७.३, कन्हेरसर २८.५, कडूस ११.५. आंबेगाव - घोडेगाव ४.३, आंबेगाव ३.८, कळंब १३.८, पारगाव ४.८, मंचर ८.५. शिरूर - टाकळी १५.३, वडगाव १८.५, न्हावरा १५.५, मलठण १०.८, तळेगाव २२.०, रांजणगाव १०.०, कोरेगाव ८५.०, पाबळ ९६.७, शिरूर ५.३. बारामती - बारामती १.५, माळेगाव ३.५, पणदरे ८.५, वडगाव ४.०, लोणी ६.३, सुपा ४.०, मोरगाव ४१.३, उंडवडी ०.८. इंदापूर - भिगवण २३.०, इंदापूर ३४.३, लोणी, बावडा २.८, काटी ७.०, निमगाव ४.०, अंथुर्णी १.०, सणसर २.०. दौंड - देऊळगाव ४१.५, पाटस २३.५, यवत ३५.३, कडेगाव ३२.५, राहू २९.८, वरवंड ७.३, रावणगाव ३८.५, दौंड १८.३. पुरंदर - सासवड ५०.०, भिवंडी ११.३, कुंभारवळण १४.३, जेजूरी ४१.३, परिंचे २१.८, राजेवाडी ५.८, वाल्हा २५.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT