पूरबाधित ऊसप्रश्‍नी  उद्या कोल्हापुरात बैठक  Premature ejaculation Meeting in Kolhapur tomorrow
पूरबाधित ऊसप्रश्‍नी  उद्या कोल्हापुरात बैठक  Premature ejaculation Meeting in Kolhapur tomorrow 
मुख्य बातम्या

पूरबाधित ऊसप्रश्‍नी  उद्या कोल्हापुरात बैठक 

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : पूरबाधित उसाची प्राधान्याने तोड देण्याप्रश्‍नी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी (ता.२१) पूरबाधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व आंदोलक संघटना यांची व्यापक बैठक घेण्याची ग्वाही दिली. खासदार धैर्यशील माने यांच्यासह आंदोलन अंकुशच्या मागणीवरून जिल्हाधिकारी यांनी साखर सह संचालकांना या बाबतचे आदेश दिले.  पूरबाधित ऊस तोडण्यास अनेक कारखाने शेतकऱ्यांची गळचेपी करतात. पूरबाधित ऊस तोडताना मजूर व वाहतूकदाराकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पूरबाधित क्षेत्राची माहिती व ते तोडण्याचे नियोजन ही सर्व माहिती साखर कारखान्यानी हजर करून त्याप्रमाणे या हंगामात अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी साखर कारखान्यांना कराव्यात, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून केली. ती तत्काळ मान्य करून जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी (ता.२१) सायंकाळी पूरबाधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व आंदोलक संघटना यांची व्यापक बैठक घेण्याचे मान्य केले.  आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे म्हणाले, ‘‘महापुराचा ऊस शेतीला फटका बसला आहे. बाधित ऊस तातडीने तोडण्याची गरज आहे. या आधीच्या पुरावेळी कारखानदारांनी बाधित ऊस प्राधान्याने तोडण्याची ग्वाही दिली. मात्र, कार्यवाही केली नाही. त्यामुळे या वर्षी असा प्रकार घडू नये. बाधित उसाची प्राधान्याने तोडणी करावी.’’ या वेळी दत्तात्रय जगदाळे, सुनील बाबर, वीरचंद पाटील उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT