Poultry farming is a good income business: Dr. Devasarkar
Poultry farming is a good income business: Dr. Devasarkar 
मुख्य बातम्या

कुक्कुटपालन चांगल्या उत्पन्नाचा व्यवसाय : डॉ. देवसरकर

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : ‘‘कुक्कुटपालनासाठी जागा, खाद्य, पाणी इतर व्यवसायाच्या तुलनेत कमी लागते. हा कमी वेळात चांगले उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी  व्यक्त  केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादतर्फे चार दिवसीय ऑनलाइन वेबिनार घेण्यात आले. परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात डॉ. देवसरकर बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण झाले. प्रशिक्षण समन्वयक डॉ. अनिता  जिंतूरकर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले. 

प्रशिक्षणात २० महिला प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. परसबागेतील कुक्कुटपालनाचे महत्त्व, परसबागेतील कुक्कुटपालनासाठी कोंबड्यांच्या जाती, कुक्कुटपालनातील रोग,आजार, लसीकरणपद्धती, यावर डॉ. जिंतूरकर यांनी मार्गदर्शन केले. 

कुक्कुटपालनाची आवश्यकता, महिला उद्योजक राजमाता पुरस्कारप्राप्त सुनंदा क्षिरसागर यांनी खाद्य निर्मिती व्यवसायातील घडामोडी बद्दल मार्गदर्शन केले. 

शिवाजी क्षीरसागर यांनी कोंबडी पालनाचे अर्थशास्त्र समजावून सांगितले. समारोपात कुक्कुट पालनाचे महत्त्व, परसातील अंड्यांची मागणी, यावर डॉ एस. बी. पवार यांनी मार्गदर्शन केले. 

डॉ. झाडे म्हणाले, ‘‘ ‘केव्हीके’च्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. कुक्कुटपालन ग्रामीण महिलांसाठी उदरनिर्वाहाचे साधन आहे.’’ 

या कार्यक्रमासाठी डॉ. बसवराज पिसुरे, प्रा. गीता यादव, डॉ. दर्शना भुजबळ, अमरीन सय्यद, डॉ. अशोक निर्वळ, शिवा काजळे, इरफान शेख आदींनी सहकार्य केले. यावेळी वेबिनामध्ये शेतकरी, तज्ज्ञांनी भाग घेतला. त्यांना तज्ज्ञांतर्फे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT