बटाटा पिकाचे नुकसान
बटाटा पिकाचे नुकसान 
मुख्य बातम्या

आंबेगावात ४ हजार एकरांतील बटाटा सडला 

सकाळ वृत्तसेवा

मंचर, जि. पुणे  ः आंबेगाव तालुक्‍यात गेले १५ दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा फटका सातगाव पठार भागातील बटाटा पिकाला बसला आहे. या भागात एकूण नऊ हजार एकर क्षेत्रापैकी जवळपास चार हजार एकर क्षेत्रातील बटाटा पीक सडून गेल्याने दहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दीड हजार शेतकऱ्यांचा सर्व खर्च पाण्यात गेला आहे. 

कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पेठ, पारगाव तर्फे खेड या गावांमध्ये खरीप हंगामात जवळपास सर्व शेतकरी मुख्य पीक म्हणून बटाटा घेतात. बटाट्याचे प्रमाणित बियाणे, खते, मजुरी असा एकरी २५ हजार रुपये खर्च शेतकऱ्यांनी केला होता, अशी माहिती कुरवंडीचे उपसरपंच रामदास बारवे यांनी दिली. २५ जून ते ५ जुलै या पहिल्या टप्प्यात लागवड केलेल्या बटाटा पिकाची वाढ दीड फुटापर्यंत झाली होती. वारा व पावसामुळे हे पीक जमीनदोस्त झाले आहे.

कोल्हारवाडीचे शेतकरी शिवाजी लक्ष्मण एरंडे यांच्या शेतातील बटाटा पिकाच्या मुळ्या सडून गेल्या आहेत. १० जुलै ते २२ जुलै या दुसऱ्या टप्प्यात लागवड झालेले बटाटे बियाणे शेतात पाणी साचून राहिल्याने सडून गेले आहे. कुरवंडीचे शेतकरी बाळासाहेब महादेव तोत्रे यांच्या शेतात बटाटा पिकाचा फुटवा न होता फक्त सरळ कोंब आले. जमीन उतारावरील, तसेच आडोसा असलेल्या ५५ टक्के क्षेत्रातील बटाटा पीक सध्या तग धरून आहे, असे बटाटा उत्पादक रवींद्र तुळशीराम तोत्रे यांनी सांगितले. झालेल्या नुकसानाचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने त्वरित करावेत, अशी मागणी बटाटा उत्पादकांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT