apmc election
apmc election 
मुख्य बातम्या

बाजार समित्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचे संकेत

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्याच्या ग्रामीण भागातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्रे असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला महत्त्वाचे स्थान मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतचा सुतोवाच केले. यामुळे बाजार समित्यांमधील सत्तेच्या वाटपात शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संधी मिळणार, असल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आला आहे.  बाजार समित्यांमध्ये नेहेमीच कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मागील महायुतीच्या सरकारने सहकार क्षेत्राबरोबरच बाजार समित्यांवर तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करत चंचुप्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. तर अनेक बाजार समित्यांच्या निवडणुका विविध कारणांनी लांबवत प्रशासक आणि प्रशासकीय मंडळांची नियुक्ती केली होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर तज्ज्ञांच्या नियुक्त्यांसह प्रशासकीय मंडळे आणि प्रशासकीय राजवट काढून निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यासाठी महायुती सरकारने शेतकऱ्यांना मतदानाचा हक्काची केलेली तरतूददेखील महाविकास आघाडी सरकारने रद्द केली आहे.  यामुळे राज्यातील विविध बाजार समित्यांच्या निवडणुका पुढील तीन महिन्यांत होत आहेत. यामध्ये पुणे, नागपूर सह विविध बाजार समित्यांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे आघाडीच्या समन्वयक समितीच्या बैठकीत ठरले आहे. त्यानुसार आता शिवसेनेला कधीही सत्तेचा वाटा न मिळालेल्या बाजार समित्यांमध्ये सत्ता मिळणार आहे. यासाठी स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आला आहे.  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुढील तीन महिन्यांत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून इच्छुक असलेले माजी उपशहर प्रमुख आणि फुलबाजार आडते व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अप्पा गायकवाड म्हणाले,‘‘ गेल्या १४ वर्षांपासून बाजार समितीवर प्रशासक आणि प्रशासकीय राजवट आहे. या राजवटीमध्ये केवळ काही निवडक व्यापारी अडत्यांची कामे होत होती. तर शेतकरी हिताच्या कामांकडे दुर्लक्ष होत होते. महाविकास आघाडीने बाजार समितीची निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या निवडणुकीत शिवसेनेकडून मी स्वतः इच्छुक असून, संचालक मंडळात ५ जागांची मागणी आम्ही करणार आहे.’’  मुंबई बाजार समितीबाबत स्पष्टता नाही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, उमेदवारी छाननी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट केली नसल्याने शिवसेनेकडून या निवडणुकीत फारसे लक्ष घातले नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT