डाळिंबाला मिळाला 130 रुपये प्रतिकिलो दर
डाळिंबाला मिळाला 130 रुपये प्रतिकिलो दर 
मुख्य बातम्या

डाळिंबाला मिळाला 130 रुपये प्रतिकिलो दर

ज्ञानेश उगले

नाशिक : औरंगाबाद जिल्ह्यातील लामकाना येथील प्रयोगशील शेतकरी कृष्णा बारबैले यांच्या उच्च गुणवत्तेच्या डाळिंबाला बुधवारी (ता. 4) नाशिक बाजार समितीच्या लिलावात 130 रुपये किलो याप्रमाणे दर मिळाला. एक नंबर डाळिंबाला प्रति क्रेटला 2600 तर 2 नंबर डाळिंबाला प्रति क्रेटला 1600 रुपये दर मिळाला. या हंगामातील हा उच्चांकी दर असल्याचे बाजार निरीक्षक मनोज झाडे यांनी सांगितले.

बारबैले यांनी बाजारात 1 नंबर गुणवत्तेचे 80 क्रेट व 2 नंबर गुणवत्तेचे 52 क्रेट इतका माल आणला होता. डाळिंब फळाचे सरासरी वजन हे 450 ग्रॅम होते. एकसारखा रंग, आकर्षकपणा व गोडी यामुळे हा चांगला दर मिळाला.

नाशिक बाजार समितीत दसऱ्यापासून डाळिंबाची आवक घटली आहे. या काळात डाळिंबाला परराज्यातून मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. गत सप्ताहात डाळिंबाला प्रति 20 किलो वजनाच्या क्रेटला सरासरी 800 ते 1600 व सरासरी 1000 रुपये दर मिळाले. बुधवारी मात्र त्यात वाढ होऊन हे दर 2600 पर्यंत वधारले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT