‘पीएम किसान’च्या लाभार्थींना पंधरा दिवसांत पीककर्ज
‘पीएम किसान’च्या लाभार्थींना पंधरा दिवसांत पीककर्ज 
मुख्य बातम्या

‘पीएम किसान’च्या लाभार्थींना पंधरा दिवसांत पीककर्ज

टीम अॅग्रोवन

नांदेड  ः पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे मोहीम राबविली जात आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी आत्तापर्यंत पीककर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना १५ दिवसाच्या कालावधीत पीककर्ज देण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे नियोजन असून यासाठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचे खाते असलेल्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. जिल्ह्यातील बँकांकडून त्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान निधी योजनेचा लाभ मिळत असलेल्या बँकेशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT