कृषी विद्यापीठ उभारणार हायटेक डेअरी फार्म
कृषी विद्यापीठ उभारणार हायटेक डेअरी फार्म 
मुख्य बातम्या

कृषी विद्यापीठ उभारणार देशी गोवंशांचा हायटेक डेअरी फार्म

टीम अॅग्रोवन

नागपूर : आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने वाटचाल करण्याच्या दिशेने पाऊल टाकत अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लवकरच देशी गोवंश संवर्धनाचा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या माध्यमातून २०० गाईंचे संगोपन करीत त्यापासून मिळणाऱ्या दुधाची खास ब्रॅण्डने विक्री केली जाणार आहे.  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सद्यस्थितीत अकोला येथे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग आहे. कृषी विद्यापीठाला लौकीक मिळवून देणाऱ्या या विभागात सद्यस्थितीत २०० देशी गाईंचे संवर्धन होते. १२२ ते १२५ लिटर दूध या गाईंपासून मिळते. त्याची विक्री कृषी विद्यापीठातील कर्मचारी तसेच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना होते. पूर्वी अतिरिक्‍त दुधाचा पुरवठा अकोला शहरातील नागरिकांनादेखील होत होता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी दुग्ध विकास विभाग अधिक सक्षम करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत कृषी विद्यापीठात लवकरच हायटेक डेअरी फार्मची उभारणी केली जाणार आहे. २०० देशी गाईंची खरेदी नव्याने या प्रकल्पाअंतर्गत केली जाईल. 

आता दुधाचा ब्रॅण्ड  पाकिस्तानातील थारपारकर तसेच गिर, साहिवाल जातीच्या २०० गाईंची खरेदी कृषी विद्यापीठ करणार आहे. सरासरी दहा लिटर दूध देणाऱ्या या गाईंपासून मिळणारे दूध काढण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर होईल. दुधाची विक्री शहरातील नागरिकांना केली जाणार असून त्याकरीता खास ब्रॅण्ड काढण्याचे प्रस्तावीत आहे. डेअरी विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. त्याअंतर्गत २०० गाईंची नव्याने खरेदी करून ब्रॅण्डच्या माध्यमातून दुधाची विक्री करण्याचे प्रस्तावीत आहे. त्याकरीता आधुनिक गोठा उभारणीच्या कामास सुरवात झाली आहे. - डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT