बोंडअळीने नुकसाग्रस्त कापूस उत्पादकांना आर्थिक मदत करा : पवार
बोंडअळीने नुकसाग्रस्त कापूस उत्पादकांना आर्थिक मदत करा : पवार 
मुख्य बातम्या

बोंडअळीने नुकसाग्रस्त कापूस उत्पादकांना आर्थिक मदत करा : पवार

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : बीटी कापसावर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांचे सोन्यासारखे पीक हातातून गेले आहे. अद्यापही या अळीवर उत्तर सापडलेले नाही. अशा गंभीर परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढावे लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १७) केले.

नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना पवार बोलत होते. या वेळी माजी मंत्री अनील देशमुख, आमदार मनोहर नाईक, माजी आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, माजी मंत्री वसुधा देशमुख, वसंतराव घुईखेडकर, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती निमीष मानकर, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की देशी वाणावर बोंडअळी आल्याने, वाण बदलाचा निर्णय घेण्यात आला. अमेरिकन मोन्सॅटो कंपनीने पहिल्यांदा बीटी वाण तयार केले. आता अळीची प्रतिकारशक्ती वाढली तर वाणाची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे असे बियाणे बाजारात आले कसे यांची चौकशी झाली पाहिजे. शासनाने महसूल यंत्रंणेमार्फत यांची तपासणी केली पाहिजे, महसूल विभागाला शिवारात जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले पाहिजेत, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नांगरणी ते कापणीपर्यंतचा सर्व खर्च देणे आवश्यक आहे. त्यात खत, बियाणे उत्पादनाची सरासरी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज अाहे.

नागपुरात कापसावर चर्चासत्र देशभरात कापसावर अनेक प्रकारचे संकट आले आहे. महाराष्ट्रात हे संकट जास्त आहे. त्यामुळे नागपुरात १६ डिसेंबरला कापूस संशोधन केंद्राला एक दिवसाचे कापसावर चर्चासत्र घेण्याचे सांगितले आहे. देभरातील संशोधक या निमित्ताने एकत्र येतील, या विषायावर व पुढील पेरणीकरिता काय करता येईल, यावर चर्चा करून दीर्घकालीन उत्तर घेण्याचे प्रयत्न राहणार आहेत.

माझा शेतकऱ्यांत ‘इंटरेस्ट’ तुमचे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहेत, आम्ही टीव्हीवर बघितले आहे. तुम्ही आमचे प्रश्‍न त्यांच्याकडे मांडा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. त्यावर पवार म्हणाले, की बोंडअळीच्या प्रकरणात मला राजकारण करायचे नाही, माझा इंटरेस्ट शेतकऱ्यांत आहे. मी शेतकरी कुटुबांतील आहे. शेतकऱ्यांवर संकट आले, की त्यांना मदत करण्याची माझी भूमिका आहे. अतिवृष्टी झाली तेव्हा मी आलो होतो, त्या वेळी दिल्लीला परत गेल्यानंतर राज्याला तत्काळ मदत पाठविली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Rate : टोमॅटोचे दर उतरलेलेच, मेथीच्या दरात वाढ, पावसाचा भाजीपाला मार्केटवर असा परिणाम

Onion Export : कांदा निर्यात परवानगीवरून राजकारण तापले! शरद पवारांसह राऊत यांची मोदींवर घणाघाती टीका

Soil Nutrient Management : जमिनीमध्ये संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

Rabadi Production Industry : रबडी निर्मितीद्वारे मिळवला दरांचा योग्य मोबदला

Hapoos Mango Prices : हापूस आंब्याच्या दरात घसरण, वादळी पावसाचा परिणाम

SCROLL FOR NEXT