डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ  
मुख्य बातम्या

‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा रविवारी प्रारंभ

टीम अॅग्रोवन

अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापनेला शनिवारी (ता. २०) ५० वर्षे पूर्ण होत अाहेत. यानिमित्त संपूर्ण वर्षभर ‘सुवर्णमहोत्सवी वर्ष’ साजरे केले जाणार असून, याचा प्रारंभ रविवारी (ता. २१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार अाहे.  विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात होणाऱ्या या सोहळ्याला राज्याचे कृषी व फलोत्पादनमंत्री तथा प्रतिकुलपती चंद्रकांत पाटील, राज्याचे वित्त, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत, महाराष्ट्र कृषी शिक्षण तथा संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खा. अॅड. संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई वाघोडे, कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांच्यासह विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, अामदार, विद्यापीठाचे माजी कुलगुरू व इतर उपस्थित राहणार अाहेत.  सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले आणि विद्यापीठाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत विविध कार्यक्रमांचे नियोजन केले अाहे.  शेतकरी हिताच्या अनेकानेक उपक्रमांची रेलचेल राहणार असून विविध चर्चासत्रे, कार्यशाळा, मेळावे, प्रशिक्षणे, प्रक्षेत्र भेटी, संमेलने आदींचे नियोजन करण्यात आले असून, गाव पातळीपासून तर आंतर राष्ट्रीय स्तरावर उपक्रम होणार आहेत. शनिवारपासून शिवार फेरी विद्यापीठ स्थापना दिवसाचे औचित्य साधत दरवर्षी शिवारफेरीचे आयोजन केले जाते. याही वर्षी ही शिवारफेरी शनिवार (ता. २०)पासून सुरू होत अाहे. २२ ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर ही फेरी घेतली जाईल. शेतकऱ्याच्या सोयीसाठी शिवारफेरीचा जिल्हानिहाय कार्यक्रम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. शनिवारी चंद्रपूर, नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्हा, रविवारी (ता. २१) अकोला, बुलडाणा, वाशीम व अमरावती तर सोमवारी यवतमाळ, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी होऊ शकतील. दुपारी ४ ते ६ या वेळेत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. वैदर्भीय शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी आधुनिक व कालसुसंगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शिवारफेरीत प्रत्यक्ष बघावे व आपल्या शंकांचे समाधान करून घेत फायद्याची शेती तंत्र आत्मसात करावे, असे आवाहन विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT