थंडी
थंडी 
मुख्य बातम्या

उस्मानाबाद ९.४ अंशांवर

टीम अॅग्रोवन

पुणे ः उत्तरेकडून थंड वारे कमी-अधिक प्रमाणात वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होत आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  राज्यातील अनेक भागांत समुद्रावर बाष्प आले आहे. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात धुके पडत आहे. गेल्या आठवड्यातही समुद्रावरून बाष्प आले होते. त्यामुळे काही प्रमाणात थंडी कमी झाली होती. सोमवार (ता. २२)पासून राज्यातील अनेक भागांत पाण्याची वाफ आली आहे. तसेच उत्तरेकडून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील बऱ्याच भागात धुके कमी जास्त प्रमाणात पडेल.  सध्या आॅस्ट्रेलियाजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. येत्या काळात ही स्थिती वादळ तयार करण्याची शक्यता आहे. या वादळामुळे भारताच्या किंबहुना महाराष्ट्राच्या वातावरणावरही थोडासा परिणाम करेल. हे वादळ बऱ्याच प्रमाणात वाऱ्यांच्या दिशेमध्ये बदल करण्याची शक्यता असून, या चक्राकार स्थितीमुळे ढग व पाण्याची वाफ ओढून घेण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. येत्या शनिवार (ता. २७) पर्यंत गोव्यासह, संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. पुणे परिसरातही सोमवार (ता. २९) पर्यंत आकाश मुख्यत निरभ्र राहण्याची शक्यता आहे.  मंगळवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १९.०, अलिबाग १९.४ (२), रत्नागिरी २०.६ (२), भिरा १६.०(१), डहाणू १७.९ (१), पुणे १२.२ (१), नगर ११.१ (-१), जळगाव १२.४, कोल्हापूर १७.१ (२), महाबळेश्वर १२.१(-१), मालेगाव १४.२ (३), नाशिक १२.६ (२), निफाड १०.२, सांगली १४.०, सातारा १३.५, सोलापूर १५.५(-१), औरंगाबाद १३.८ (२), बीड १४.० (१), परभणी (कृषी विद्यापीठ) १०.०, परभणी शहर ११.५ (-३), नांदेड १५.० (१), उस्मानाबाद ९.४, अकोला १५.१ (१),  अमरावती १४.४, बुलडाणा १५.२, चंद्रपूर १३.२ (-२), गोंदिया १०.२ (-३), नागपूर ११.९ (-२), वर्धा १२.१(-२), यवतमाळ १६.०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT