प्रशासक कायम ठेवण्याचे आदेश Order to retain administrator
प्रशासक कायम ठेवण्याचे आदेश Order to retain administrator 
मुख्य बातम्या

संग्रामपूर बाजार समितीवर प्रशासक कायम ठेवण्याचे आदेश

टीम अॅग्रोवन

बुलडाणा  : जिल्ह्यातील संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती कायम ठेवण्याचा आदेश पणन संचालकांनी दिला आहे. विद्यमान सत्तारूढ संचालक मंडळाविरुद्ध ही कारवाई मानली जात आहे.  बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक बसविण्याचा आदेश गेल्या काळात जिल्हा उपनिबंधकांनी दिला होता. या विरुद्ध विद्यमान सभापती गजानन दाणे व त्यांच्या समर्थक संचालकांनी पणन संचालकांकडे अपील करीत स्थगिती मिळवली होती. यावर संग्रामपूर बाजार समितीचे संचालक शांताराम दाणे व त्यांच्या सहकार विकास आघाडीच्या सहा संचालकांनी १३ जुलैला याचिका दाखल केली होती. यामध्ये विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली होती. तक्रारदारांकडून ॲड. विरेंद्र झाडोकार यांनी युक्तिवाद केला. जिल्हा उपनिबंधकांनी दिलेला बाजार समिती बरखास्तीचा आदेश कायम ठेवा अशी मागणी केली. यावर पणन संचालकांनी आदेश मान्य करीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणनच्या नियमानुसार संग्रामपूर बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्‍त करण्याचा आदेश दिला. बाजार समितीवर प्रशासक नेमण्याची सूचना आदेशाद्वारे कली आहे. या बाजार समितीसाठी २०१५मध्ये निवडणूक झाली होती. या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे २०२०मध्ये संपली आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया राबविता न आल्याने पणन खात्याने बाजार समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिलेले आहेत. या घडामोडींमुळे सहकार क्षेत्रात उलटसुलट चर्चांना सुरवात झाली आहे. सर्वांच्या नजरा आगामी निवडणुकीकडे लागल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT