इजिप्त मधून होणार कांदा आयात
इजिप्त मधून होणार कांदा आयात 
मुख्य बातम्या

इजिप्तवरून आयात होणार कांदा 

तात्या लांडगे

सोलापूर : देशातील कोणकोणत्या राज्यात कांद्याची लागवड किती झाली आणि अपेक्षित उत्पादन किती होईल, याची माहिती मंत्रालयातून मागविण्यात आली आहे. देशातील अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादनात घट झाली आहे. दिवसेंदिवस कांद्याचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने आता इजिप्तहून कांदा आयात करण्याचे नियोजन केले आहे. 

केंद्र सरकारने एक लाख टन क्‍विंटलची निविदा काढली असून, काही दिवसांत कांदा देशात आणला जाणार असल्याची माहिती राज्याच्या पणन विभागातील सूत्रांनी सांगितले. अतिवृष्टीचा मोठा परिणाम कांदा लागवड आणि उत्पादनावर झाला. महाराष्ट्रात कांद्याचा कमाल दर क्‍विंटलसाठी नऊ हजारांवर पोचला असून दिल्लीसह अन्य राज्यांमध्येही अशीच स्थिती आहे. 

दरम्यान, गेल्या वेळेस पाकिस्तानावरुन कांदा येणार असल्याने मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे तुर्कस्तान अथवा इजिप्तहून कांदा आयात करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यात आता इजिप्तला पसंती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने कांदा आयातीचे टेंडर काढले असून, गरज पडल्यास आणखी कांदा आयात करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगिले. सप्टेंबर २०१३ पासून कोटा पद्धत बंद केल्याने गरज पडल्यास कांदा आयात करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातील कांदा उत्पादनात घट झाल्याने कांदा आयात केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. 

तीन दिवसच पुरणार आयातीचा कांदा  देशात आयात होणारा १ लाख टन कांदा संपूर्ण देशाचा विचार करता केवळ दोन-तीन दिवसांची गरज भागवेल एवढाच असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. या आयातीचा सध्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता नगण्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT