पिंपळनेर बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल ३४०० रुपये दर
पिंपळनेर बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल ३४०० रुपये दर 
मुख्य बातम्या

पिंपळनेर बाजार समितीत कांद्याला ३१०० ते ३४०० दर

टीम अॅग्रोवन

पिंपळनेर, जि. धुळे  ः साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येथील उपबाजार समितीत कांद्याला ३१०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. समितीत सोमवारी (ता. १६) सुमारे ५०० हून अधिक वाहनांतून ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आता शेतकऱ्यांकडे अल्प प्रमाणात उन्हाळ कांदा शिल्लक असून, राज्यात सर्वत्र कांद्याचे दर कडाडले आहेत. मात्र, या वाढीव दराचा फायदा कमी शेतकऱ्यांना होत आहे.  येथील उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी होत आहे. केवळ २००० ते २४०० रुपये भाव मिळत असताना परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री केली. दुसरीकडे तीन-चार दिवसांपासून मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात आज ३४०० रुपयांपर्यंत वाढ झाली. सध्या शेतकऱ्यांकडे अगदी कमी प्रमाणात कांदा शिल्लक आहे. त्यामुळे भाव वाढला; परंतु शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही, अशी स्थिती झाली आहे. उपबाजार समितीत आज पाचशेहून अधिक वाहनांतून सुमारे ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला कमीत कमी ३१०० आणि जास्तीत जास्त ३४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.  बाजार समितीचे शाखाप्रमुख संजय बावा आणि संचालकांच्या उपस्थितीत आज सकाळी अकराला कांदा लिलावाला सुरवात झाली. खरेदीसाठी व्यापारी नासीर सय्यद, प्रा. किरण कोठावदे, संचालक गजेंद्र कोतकर, प्रभाकर कोठावदे, प्रमोद कोठावदे, हेमंत कोठावदे, दीपक भदाणे, बापू काकुस्ते, दीपक बागड, रावसाहेब घरटे, जितेंद्र कोतकर, बाळासाहेब घरटे, राजेंद्र शिरसाट, महेश भदाणे, अरुण नंदन आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपला कांदा समितीच्या आवारात विक्रीस आणून सहकार्य करावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले. आज कांद्याला प्रतिक्विंटल ३४०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT