Onion imports increased in Khandesh; Maximum rate 3200
Onion imports increased in Khandesh; Maximum rate 3200 
मुख्य बातम्या

खानदेशात कांद्याची आवक वाढली; कमाल दर ३२००

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक गेल्या चार ते पाच दिवसांत वाढली आहे. जळगाव बाजार समितीत गेल्या चार ते पाच दिवसा प्रतिदिन सरासरी ६०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. कमाल दर ३२०० रुपये प्रतिक्विंटल एवढे आहेत.

दर मध्यंतरी कमी झाले. परंतु नव्या कांद्याची मागणी बीजोत्पादनासह हॉटेल व्यवसायात आहे. यामुळे दरात पुन्हा सुधारणा दिसत आहे. किमान दर ८०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. सरासरी दर २२०० रुपये प्रतिक्विंटल एवढे आहेत. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल), धुळे, साक्री (जि. धुळे), पिंपळनेर (ता. साक्री) येथेही नव्या कांद्याची आवक सुरू झाली आहे.

नव्या कांद्याची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत जळगाव, अडावद येथे अधिक आहे. गेल्या हंगामात कमी लागवड व अतिपावसात मोठे नुकसान झाले होते. यंदा अतिउष्णता व अतिजोरदार पावसात कांदा रोपवाटिकांचे जून, जुलैमध्ये नुकसान झाले. परंतु नंतर अनेक शेतकऱ्यांनी उत्तम नियोजन करून कांद्याचे उत्पादन घेतले आहे. यामुळे जळगाव, धुळे येथे आवक अधिक आहे.

धुळे येथे गेल्या चार दिवसांत प्रतिदिन ७०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. तर अडावद येथेही सध्या रोज ३०० क्विंटल लाल कांद्याची आवक सुरू आहे. नव्या कांद्याची आवक सुरू झाल्याने साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्याची विक्रीही बाजार समितीत व्यापारी व इतरांनी सुरू केली आहे. यामुळे कमी दर्जाच्या कांद्याचे दर घसरले आहेत. दर्जेदार कांद्याला मात्र उठाव असून, दर गेले पाच ते सात दिवस टिकून आहेत. कांद्याची आवक पुढे वाढू शकते, असा अंदाज आहे.

सध्या जळगाव येथील बाजारात जालना, औरंगाबादसह जळगावमधील भुसावळ, जळगाव, जामनेर, यावल, चोपडा आदी भागांतून कांद्याची आवक सुरू आहे. तर धुळे येथे नंदुरबार, शिरपूर, धुळे, मालेगाव आदी भागातून लाल कांद्याची आवक सुरू आहे. चाळीसगाव येथील बाजारात भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, नाशिकमधील नांदगाव आदी भागातून कांद्याची आवक सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT