Officers in 'irrigation' scam, lodge cases against contractors
Officers in 'irrigation' scam, lodge cases against contractors 
मुख्य बातम्या

‘सिंचन’ घोटाळ्यातील अधिकारी, कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल

टीम अॅग्रोवन

अकोला : विदर्भातील सिंचन प्रकल्पात केलेल्या घोटाळ्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या सिंचनप्रकल्प घोटाळ्यात अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतील प्रकल्पांचा समावेश आहे. 

अकोला जिल्ह्यातील उमा बॅरेज, दगडपारवा, पूर्णा बॅरेज, बुलडाणा जिल्ह्यातील हिरडव व पेनटाकळी या पाच प्रकल्पांचा समावेश आहे. यापूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील जिगावसह अमरावती जिल्ह्यातील वाघाडी, रायगड आणि निम्नपेढी प्रकल्पात झालेल्या घोळ प्रकरणात चार गुन्हे दाखल झाले होते. आता अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील भागडी प्रकल्पासह एकूण सात प्रकरणात बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले. दाखल झालेल्या गुन्हयांची संख्या ११ झाली आहे.

प्रकल्पाचे काम करताना काढलेल्या निविदा प्रक्रियेत पात्रता नसतानाही कंत्राटदारांनी कार्य पूर्णत्व प्रमाणपत्रात बदल करून बनावट प्रमाणपत्र सादर केले. यात संबंधित तत्कालीन अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

निविदा मंजूर करण्यापूर्वी प्रमाणपत्राची शहानिशा करण्यात आली नाही. पडताळणी न करता कंत्राटदारास निविदेसाठी पात्र ठरविल्या गेले. अधिकाऱ्यांनी सार्वजनिक हिताकडे लक्ष न देता पदाचा दुरुपयोग केला, असा ठपका चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात ठेवण्यात आला आहे.  यामुळे जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्यासह, लेखाधिकारी, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, लिपीक, कंत्राटदार कंपनी व संचालक आदींविरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलिस उपअधीक्षक आर. एन. मलघाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड हे काम पाहत आहेत.

यांच्याविरुद्ध दाखल झाले गुन्हे 

अकोला जिल्ह्यातील दगडपरवा या प्रकल्पासंदर्भात मेसर्स आर. जे. सहा अ‍ॅण्ड कंपनी मुंबई व ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांच्यासह तत्कालीन कार्यकारी अभियंता एम. टी. देशमुख यांचेही नाव तक्रारीत आलेले आहे. अकोला जिल्ह्यातीलच उमा बॅरेज प्रकल्पासंदर्भात मे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन, टी. बी. पी. आर. इन्फ्रा.चे सर्व संचालक,व्यवसाय कंत्राटदार यांच्यासह तत्कालीन कार्यकारी अभियंता एम. टी. देशमुख, टी. बी. पी. आर. इन्फास्ट्रक्चरचे संचालक, अमर शेंडे, तत्कालीन लेखापाल अरुण कोकुडे, तत्कालीन कार्यकारी अभियंता विजय लोळे, तत्कालीन निविदा लिपिक नरेंद्र मिश्रा यांचा समावेश आहे. पूर्णा बॅरेज प्रकरणात एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चरचे  सर्व संचालक, व्यवसाय कंत्राटदार, तत्कालीन कार्यकारी अभियंता एम. टी. देशमुख, तत्कालीन लेखाधिकारी संजीवकुमार, दीपक देशकर तर बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पासंदर्भात पुणे येथील कंत्राटदार तानाजी एकनाथ जंजिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरवड प्रकल्पा (ता. लोणार)संदर्भात कंत्राटदार अरुण मापारी (औरंगाबाद) यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणी आता पुढील कारवाई वरिष्‍ठ स्तरावरून केली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT